तुमच्या Anxiety ला बनवा तुमची सुपरपॉवर, तज्ज्ञांनी सांगितले यावर मात करण्याचे सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:43 PM2021-12-21T17:43:03+5:302021-12-21T17:45:01+5:30

जगातील प्रसिद्ध न्यूरो तज्ज्ञ डॉ. वेंडी सुझुकी (Wendy Suzuki) यांनी एन्झायटीचं रुपांतर सुपरपॉवरमध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. एन्झायटीचा त्रास होणं ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. परंतु, याचा शरीरावर परिणाम होऊ देणं चुकीचं आहे. याच एन्झायटीचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य अधिक चांगलं बनवू शकता, असं वेंडी सुझुकी म्हणाल्या.

make anxiety as your super power doctor tells ways to handle anxiety | तुमच्या Anxiety ला बनवा तुमची सुपरपॉवर, तज्ज्ञांनी सांगितले यावर मात करण्याचे सोपे उपाय

तुमच्या Anxiety ला बनवा तुमची सुपरपॉवर, तज्ज्ञांनी सांगितले यावर मात करण्याचे सोपे उपाय

googlenewsNext

सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना मानसिक (Mental health problem) आणि शारीरिक (Physical) समस्यांना सामोरं जावं लागतं. एन्झायटी (Anxiety), डिप्रेशन (Depression), स्ट्रेस (Stress) आदी मानसिक गोष्टींचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. यामुळे अनेकांना जीवनात मोठं नुकसान सहन करावं लागतं. कारण हे आजार केवळ मानसिकच नाही तर जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रतिकूल परिणाम करतात. मात्र या आजाराकडे सकारात्मक पाहिलं तर जीवनात चांगला बदल घडून येऊ शकतो, असं अभ्यासातून दिसून आलं आहे. यासाठी ही ट्रिक्स आहेत आणि त्याचा वापर केल्यास संबंधित व्यक्तीची मानसिकता अधिक चांगली होते.

जगातील प्रसिद्ध न्यूरो तज्ज्ञ डॉ. वेंडी सुझुकी (Wendy Suzuki) यांनी एन्झायटीचं रुपांतर सुपरपॉवरमध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. एन्झायटीचा त्रास होणं ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. परंतु, याचा शरीरावर परिणाम होऊ देणं चुकीचं आहे. याच एन्झायटीचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य अधिक चांगलं बनवू शकता, असं वेंडी सुझुकी म्हणाल्या.

झी न्यूजने डेली मेलच्या वृत्ता हवाला देत दिलेल्या रिपोर्टनुसार, डॉ. वेंडी सुझुकी यांनी सांगितलं आहे की. "एन्झायटीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारणांचा सर्वप्रथम शोध घेणं गरजेचं आहे. एन्झायटी वाढवणारी सर्वात महत्त्वाची 5 कारणं शोधा ती कागदावर लिहून काढा. उदाहरणार्थ तुमची एन्झायटी वाढण्यामागं जर पैसा किंवा सामाजिक कारण असेल तर त्यामागील घटना लिहून काढा. जसं की पैशांच्या कमतरतेमागं पालकांची नकारात्मक भूमिका असणं, शालेय जीवनात मिळालेला चुकीचा सल्ला मिळणं आणि त्यामुळे तुम्ही अंतर्मुख होणं. असा सर्व तपशील एका कागदावर लिहून काढावा. यातून तुम्हाला तुमचा मार्ग निश्चित सापडू शकतो."

डॉ. वेंडी सुझुकी पुढे म्हणाल्या, "त्या व्यतिरिक्त तुम्हाला असलेल्या एन्झायटीपैकी एका कारणावर फोकस करा. उदाहरणार्थ जर तुम्ही सर्वांसमोर बोलण्यास घाबरता असाल तर केवळ याच मुद्दयावर लक्ष केंद्रीत करा. त्यानंतर 5 मिनिटं तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करा. त्यानंतर डोळे बंद करुन तुम्ही लोकांसमोर उत्तमप्रकारे भाषण करून कौतुकास पात्र ठरला आहात, असा विचार करा. त्यानंतर माझं भाषण आवडल्यानं लोकं माझं कौतुक करत आहेत, असं शेवटी मोठ्या बोला. अशा पध्दतीनं ज्या गोष्टीची एन्झायटी वाटते त्यातून बाहेर येण्यासाठी आणि प्रत्यक्षात ती गोष्ट मिळवण्याबाबत विचार करा. उदाहरणार्थ तुम्हाला पैशांची कमतरता जाणवत असेल तर या एन्झायटीबाबत मी खूप श्रीमंत आहे, आणि मी कोणतीही गोष्ट खरेदी करु शकतो, असा सकारात्मक विचार करा"

"अशा पद्धतीनं एक्सरसाइज केल्यानं तुम्हाला तुमचं लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. तसेच सकारात्मकता (Positivity) वाढेल. जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीची एन्झायटी वाटू लागेल तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टीचा विचार सुरू करा. तसेच तुम्हाला कधीतरी मदत केलेल्या लोकांना आभाराचा मेसेज पाठवा. तुमचा मेसेज पाहून ते आनंद व्यक्त करतील आणि तुम्हालाही आनंद मिळेल", असं डॉ. सुझुकी यांनी सांगितलं.

Web Title: make anxiety as your super power doctor tells ways to handle anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.