मलायका अरोरा फॉलो करते 'ही' स्ट्रेचिंग एक्सरसाइज; परफेक्ट फिगरचा खास फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 01:17 PM2019-10-15T13:17:02+5:302019-10-15T13:28:35+5:30
प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची मुन्नी अभिनेत्री मलायका अरोराने स्ट्रेचिंग करतानाचे आपले फोटो ऑनलाइन शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेसच्या चर्चा रंगल्या आहेत.
प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची मुन्नी अभिनेत्री मलायका अरोराने स्ट्रेचिंग करतानाचे आपले फोटो ऑनलाइन शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेसच्या चर्चा रंगल्या आहेत. या फोटोमध्ये मलायकाने स्ट्रेचिंग (Stretching Exercise) करण्याची योग्य पद्धत सांगितली असून त्याचे फायदेही तिने सांगितले आहेत. मलायका अनेकांच्या गळ्यातील ताईत असून तरूणींची फिटनेस आयकॉनही आहे. ती नेहमी आपले एक्सरसाइज करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
मलायकाचं वय 45 वर्ष असून या वयातही तिच्या फिटनेस आणि फिगरचं गुपित अनेक चाहते तिला सतत विचारत असतात. लाखो चाहत्यांच्या प्रश्नाचं जणू उत्तरच मलाकाने आपल्या या फोटोतून दिलं आहे. मलायका जिममध्ये वेगवेगळ्या एक्सरसाइज करत असते. त्यातीलच एक स्ट्रेचिंग. ही एक अशी एक्सरसाइज आहे, जी मलायकाच्या वर्कआउट रूटिनमध्ये सहभागी आहे.
स्ट्रेचिंग एक साधारण वाटणारी एक्सरसाइज आहे. कारण कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ही एक्सरसाइज अगदी सहज करू शकते. स्ट्रेचिंगमुळे शरीरातील स्नायू स्ट्रेच होतात. त्यामुळे स्नायूंच्या वेदना दूर होण्यास मदत होते.
फ्लेक्सिबिलिटी आणि ब्लड सर्क्युलेशन होतं सुरळीत
स्ट्रेचिंगमुळे शरीर आणि मसल्सची फ्लेक्सिबिलिटी वाढते. त्याचबरोबर या एक्सरसाइजमुळे शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन उत्तम होतं. यामुळे स्नायूंवरील ताण कमी होतो. हिप्स आणि पायांच्या मांसपेशींसाठी स्ट्रेचिंग एक उत्तम एक्सरसाइज आहे. स्ट्रेचिंगमुळे हिप्स आणि पायांच्या मसल्स फ्लेक्सिबल राहतात.
बॉडी पॉश्चर राहतं योग्य...
बॉडी पॉश्चर योग्य ठेवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइजचा सल्ला देण्यात येतो. कारण यामुळे मणक्यावर परिणाम होतो आणि तुमचं शरीर योग्य स्थितीमध्ये राहण्यास मदत होते.
झोपेच्या समस्या होतात दूर...
मसल्स स्ट्रेच व्यतिरिक्त मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठीही स्ट्रेचिंग मदत करते. शांती आणि आरामदायी राहण्यासाठी उपयोगी ठरणारं हार्मोन्स एंडोर्फिन्सच्या निर्मितीसाठी स्ट्रेचिंग मदत करतं. त्यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्ही खूश राहता.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)