Male Fertility Tips: स्पर्म काऊंट कमी करतायत पुरुषांच्या 'या' चुकीच्या सवयी, प्रजनन क्षमताही होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:02 PM2022-06-12T17:02:10+5:302022-06-12T17:02:19+5:30

Bad habits harm sperm count: तज्ञांच्या मते, आजच्या काळात पुरुषांचे स्पर्म काऊंट आणि प्रजनन क्षमता कमी होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या काही वाईट सवयी आहेत.

male fertility tips mens bad habits that can harm sperm count and reproductive health know details | Male Fertility Tips: स्पर्म काऊंट कमी करतायत पुरुषांच्या 'या' चुकीच्या सवयी, प्रजनन क्षमताही होतेय कमी

Male Fertility Tips: स्पर्म काऊंट कमी करतायत पुरुषांच्या 'या' चुकीच्या सवयी, प्रजनन क्षमताही होतेय कमी

googlenewsNext

वाढत्या वयानुसार, स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता कमी होते. तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार जे लोक ३० ते ४० वयोगटातील आहेत आणि जे लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्या मुलं होण्याच्या क्षमतेवर खूप परिणाम होतो. जेव्हा एखादा पुरूष ४० वर्षांच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्याची प्रजनन क्षमता कमी होते. जर एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होत नसेल, तर त्यापैकी सुमारे ५० टक्के प्रकरणांमध्ये या समस्यांची माहिती पुरुषांच्या आरोग्यावरूनही मिळू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गेल्या काही दशकांमध्ये पुरुषांमध्ये स्पर्म काऊंटची कमी दिसून आली आहे. प्रत्येक ८ पैकी एका दांपत्याला गर्भधारणेसंदर्भातील समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापैकी ४० टक्के प्रकरणं मेल इंफर्टेलिटीमुळे आहेत. टाएट, योग्य झोप न मिळणे, स्थुलपणा, सायकोलॉजिकल स्ट्रेस, लॅपटॉप मोबाईल रेडिएशन, स्मोकिंग, मद्यपान, ड्रग्स अशा गोष्टी प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम करत असल्याची माहिती गुरुग्राममधील डॉक्टर गुंजन सभरवाल यांनी दिली. आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करत यात सुधारणा आणली केली शकते, असंही त्यांनी सांगितलं.

कोणत्या आहेत वाईट सवयी?

धुम्रपान आणि मद्यपान - तंबाखूच्या सेवनामुळे आणि धुम्रपानाचा परिणाम स्पर्म्सवर होतो. तसंच ते स्पर्म्सच्या डीएनएलाही नुकसान करतात. याशिवाय मद्यपानामुळे टेस्टोस्टेरोन लेव्हल कमी होते. ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन आणि स्पर्म प्रोडक्शन कमी होतं.

स्थुलपणा - स्थुल असलेल्या पुरुषांमध्ये सामान्य बीएमआय कॅटेगरीतील पुरुषांच्या तुलनेत वीर्याची गुणवत्ता कमी असते. स्थुल लोकांणध्ये स्पर्म्सचे डीएनए अधिक डॅमेज असतात आणि ते प्रजनन क्षणतेवर परिणाम करतात.

तणाव - तणावामुळे टेस्टोस्टेरॉनचे असंतुलन होते आणि नंतर हार्मोनल बदलांमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर चुकीचा परिणाम होतो.

नशेच्या औषधांचा वापर - बरेच लोक स्नायू वाढवण्यासाठी आणि स्टॅमिना  वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरतात. हे अंडकोष संकुचित करू शकते आणि स्पर्मचे उत्पादन कमी करू शकते. याशिवाय, कोकेन किंवा गांजाच्या वापरामुळे तुमच्या स्पर्म्सची संख्या आणि क्वालिटीही कमी होऊ शकते.

संथ लाईफस्टाईल - तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार संथ लाईफस्टाईलमुळे स्पर्मची क्वालिटी आणि प्रमाण, स्टॅमिना कमी होऊ शकतो. यामुळे संपूर्णच फर्टिलिटी कमकुवत होऊ शकते. दरम्यान, अशा समस्यांपासून दूर राहणं आवश्यक आहे. तसंच फर्टिलिटी संदर्भात कोणतीही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे.

Web Title: male fertility tips mens bad habits that can harm sperm count and reproductive health know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य