भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार
By Manali.bagul | Published: January 27, 2021 12:30 PM2021-01-27T12:30:36+5:302021-01-27T12:31:46+5:30
यात निरोगी पुरूष आणि त्यांच्या फर्टिलिटी फोन रेडिएशनवर अभ्यास करण्यात आला होता.
जास्तीत जास्त लोकांना उशीरापर्यंत आपला फोन पाहण्याची सवय असते. तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमची हीच सवय आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. नवीन अभ्यासानुसार फोनमधून बाहेर येणारे ब्लू लाईट्स पुरूषांची स्पम क्वालिटी खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. हा अभ्यास अमेरिकेतील वर्च्यूअल स्लीप पत्रिकेत छापण्यात आला होता. या स्टडीसाठी संशोधकानी २१ ते ५९ वर्ष वयोगटातील ११६ पुरूषांच्या स्पमर्सचे नमुने एकत्र केले होते. या सगळ्यानाच फर्टिलीटी इवॅल्युएशनच्या समस्येचा सामना करावा लागत होता. या सगळ्या लोकांना झोपेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत होता.
या अभ्यासात नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार गॅजेट्समधून बाहेर येणारी लाईट आणि स्पम क्वालिटी यांमधील संबंध लावण्यात आला होता. यात निरोगी पुरूष आणि त्यांच्या फर्टिलिटी फोन रेडिएशनवर अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासानुसार इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया उपकरणांच्या वापरानं प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम झालेला दिसून आला. स्मार्ट फोन्स आणि टॅबलेट्समधून बाहेर येणारे लाईट्स स्पर्मच्या गतीशीलतेवर गंभीर परिणाम करत आहेत.
या संशोधनात दिसून आलं की, या उपकरणांमधून बाहेर येणारे शॉर्ट वेवलेंथ लाईटचा संपर्क अधिक असतो. इमोटाईल स्पर्मचे प्रमाण जास्त असते. या अभ्यासात दिसून आले की जास्तीत जास्त झोप घेणाऱ्या तरूणाांमध्ये स्पमस काऊंट चांगले होते. यातून असं दिसून आलं की जे लोक वेळेवर झोपतात त्यांच्या शरीरातील स्पर्म्स काऊंट चांगला असतो. याशिवाय जे लोक रात्री उशिरापर्यंत टॅबलेट्सचा वापर करतात. त्यांच्यातील स्पर्म्स कमी होतात यामुळेच इनफर्टिलिटी वाढते. कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा
स्मार्टफोनमुळे डीएनएहीसुद्धा नुकसान पोहोचते. त्यामुळे पेशी स्वतःहून आपली क्षमता कमी करतात. स्पम्स किंवा एग सेल रेडिएशन गर्भपाताचे कारण ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार सामान्य लोकसंख्या पुरूषांमधील इनफर्टिलिटी २० ते ४० टक्क्यांनी वाढवते. भारतात २४ टक्के पुरूषांना इनफर्टिलीटीचा सामना करावा लागत आहे. या अभ्यासानुसार या रेडीएशनवर प्रभावही पडतो. कोणत्याही उपकरणाचा वापर पूर्णपणे बंद करणं योग्य ठरणार नाही. पण तुम्ही झोपण्याआधी या उपकरणाचा वापर करणं टाळायला हवा. Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही