एकावर एक सिगारेट ओढणाऱ्याने दान केले होते फुप्फुसं, ऑपरेशन करून काढले बाहेर आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:54 PM2019-11-20T14:54:58+5:302019-11-20T14:59:27+5:30
सामान्यपणे अवयव दान कुणीही करू शकतं. फक्त त्यांचे अवयव व्यवस्थित असावेत. अशीच अवयव दानाबाबतची एक वेगळी घटना समोर आली आहे.
सामान्यपणे अवयव दान कुणीही करू शकतं. फक्त त्यांचे अवयव व्यवस्थित असावेत. अशीच अवयव दानाबाबतची एक वेगळी घटना समोर आली आहे. येथील Wuxi People Hospital जियांगसुची घटना आहे. इथे एका व्यक्तीचं निधन झालं. तो ब्रेन डेडने मरण पावला. त्याने मृत्युआधीच त्याचे अवयव दान केले होते. डॉक्टरांनी आधी फुप्फुसांची तपासणी केली. वेगवेगळ्या टेस्ट केल्या आणि ऑपरेशन केलं. जेव्हा त्याची फुप्फुसं काढण्यात आली, डॉक्टर ते फुप्फुसं पाहून हैराण झालेत. फुप्फुसाची स्थिती पाहूनच डॉक्टरांनी ते घेण्यास नकार दिला.
डॉक्टर चेन यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन करण्यात आलं. रूग्णाने आधीच त्याची अवयव दानाची प्रोसेस करून ठेवली होती. त्याचा मृत्यू झाल्यावर लगेच डॉक्टरांनी काम सुरू केलं. जेव्हा त्यांनी फुप्फुसं काढले तर ते पूर्णपणे काळे झाले होते. साधारणपणे फुप्फुसांचा रंग फिक्कट गुलाबी असतो. पण हे पूर्णपणे खाळं झालं होतं.
चेन स्मोकरचं फुप्फुस
डॉक्टरांना मृत व्यक्तीच्या परिवाराकडून माहिती मिळाली की, मृत व्यक्ती गेल्या ३० वर्षांपासून धुम्रपान करत होती. इतकेच नाही तर ती व्यक्ती चेन स्मोकर होती. म्हणजे त्याने एकदा सिगारेट ओढणं सुरू केलं तर एकाचवेळी ४ ते ५ सिगारेटी ओढत होता.
(सांकेतिक फोटो)
डॉक्टर चेन यांनी ५२ वर्षीय मृत रूग्णाच्या फुप्फुसाचा व्हिडीओ काढलाय. जेणेकरून धुम्रपान करणाऱ्यांनी यातून काही शिकावं. डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीच्या फुप्फुसाचा काहीच उपयोग नाही. हे फुप्फुस इतकं खराब झालं होती की, त्यांना श्वासही घेता येत नसेल. डॉक्टरांनी हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, आमच्या चीनमधील लोकांना सिगारेट ओढणं फार चांगलं वाटतं. पण त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. काय आताही तुम्ही धुम्रपान करण्याची हिंमत कराल का?