अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:14 PM2024-10-02T15:14:21+5:302024-10-02T15:23:18+5:30

कोरोना, इबोला आणि मंकीपॉक्सनंतर आता जगात आणखी एका खतरनाक व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे.

Marburg Virus causes symptoms prevention treatment | अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस

अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस

कोरोना, इबोला आणि मंकीपॉक्सनंतर आता जगात आणखी एका खतरनाक व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. या व्हायरसमुळे डोळ्यांतून रक्तस्राव सुरू होतो. मारबर्ग व्हायरस (Marburg Virus) असं या व्हायरसचं नाव आहे. या व्हायरसचा संसर्ग  झालेल्या १०० पैकी ८८ रुग्णांचा मृत्यू होतो. रवांडामध्ये या आजारामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसच्या संसर्गामुळे खूप ताप येतो आणि रक्तस्त्राव सुरू होतो. या व्हायरसबद्दल जाणून घेऊया...

मारबर्ग व्हायरस किती धोकादायक?

डब्ल्यूएचओच्या मते, मारबर्ग हा अतिशय वेगाने पसरणारा व्हायरस आहे. यामुळे ताप आणि रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग इतरांमध्ये पसरू शकतो. हा संसर्ग कोणत्याही प्रकारच्या द्रव किंवा रक्ताच्या संपर्कात आल्यावर पसरतो. संक्रमित व्यक्तीचं रक्त कुठेतरी पडलं आणि कोणीतरी त्याच्या जवळ गेलं तरीही व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. 

मारबर्ग व्हायरस कुठून आला?

मारबर्ग व्हायरस सर्वप्रथम १९६१ मध्ये जर्मनीतील फ्रेंकफर्ट येथे आढळला होता. त्याच वेळी, मारबर्ग व्हायरसचे रुग्ण बेलग्रेड आणि सर्बियामध्ये देखील आढळले. युगांडामध्ये सायंटिफिक कामासाठी आफ्रिकन ग्रीन मंकी आणला होता, याच माकडापासून प्रयोगशाळेत व्हायरस पसरला. त्यानंतर हा व्हायरस आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये पसरला. 

मारबर्ग व्हायरसची लक्षणं

- खूप ताप येणं
- थंडी वाजणं
- तीव्र डोकेदुखी
- कफ, घसा खवखवणे
- स्नायू आणि सांधेदुखी
- त्वचेवर पुरळ उठणे
- छाती आणि पोट दुखणे
- अतिसार
- उलट्या
- डोळे, नाक, तोंडातून रक्तस्त्राव

मारबर्ग व्हायरसवर उपचार काय?

मारबर्ग व्हायरससाठी अद्याप कोणतंही औषध किंवा लस तयार केलेली नाही. त्यास प्रतिबंध करण्याचे अनेक मार्ग आहेत. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टर अनेक औषधे देतात. यासोबतच इम्यून थेरपीही दिली जाते. यामध्ये वेदनाशामक औषध आणि ऑक्सिजन दिला जातो.
 

Web Title: Marburg Virus causes symptoms prevention treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.