कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:58 PM2021-08-10T17:58:12+5:302021-08-10T17:58:37+5:30

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हा विषाणू वटवाघळांपासून पसरतो. त्याचा मृत्यूदर 88 टक्क्यांपर्यंत आहे. 2 ऑगस्ट रोजी दक्षिण गुएकेडौ प्रांतात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

Marburg virus highly infectious disease detected in west africa for first time says who | कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा

कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा

Next

जिनेव्हा - जगात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातलेले असतानाच आणखी एक नवा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम अफ्रिकन देश गिनीमध्ये (Guinea) घातक मारबर्ग व्हायरसचा (Marburg disease) पहिला रुग्ण आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची पुष्टी केली आहे. हा विषाणू इबोला आणि कोरोनापेक्षाही अधिक घातक मानला जातो. हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्येही पसरू शकते. अशा स्थितीत गिनीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Marburg virus highly infectious disease detected in west africa for first time says who)

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हा विषाणू वटवाघळांपासून पसरतो. त्याचा मृत्यूदर 88 टक्क्यांपर्यंत आहे. 2 ऑगस्ट रोजी दक्षिण गुएकेडौ प्रांतात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू आढळला आहे. शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीमध्ये इबोला आढळून आला नाही, मात्र मारबर्ग विषाणू आढळला आहे.

CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

"मारबर्ग विषाणूचा दूरवर प्रसार होऊ नये, यासाठी त्याला ट्रॅकमध्येच थांबविण्याची आवश्यकता आहे," असे आफ्रिकेचे डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी म्हटले आहे.

डब्ल्यूएचओने गेल्या दोन महिन्यांपूर्वी गिनीमध्ये इबोला विषाणूचा अंत झाल्याची घोषणा केली होती. यानंतर गिनीमध्ये मारबर्ग विषाणू सापडला आहे. येथे गेल्या वर्षी, इबोलाची सुरुवात झाली होती, यात 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच बरोबर, प्रादेशिक स्तरावर या विषाणूचा धोका अधिक, तर जागतिक स्तरावर कमी आहे, असेही WHO ने म्हटले आहे. याशिवाय गिनी सरकार नेही एका निवेदनात मारबर्गची पुष्टि केली आहे.

Web Title: Marburg virus highly infectious disease detected in west africa for first time says who

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.