व्यायाम करतेवेळी मास्क वापरल्याने फुफ्फुसांवर 'असा' होतो परिणाम; तज्ज्ञांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 07:49 PM2020-11-19T19:49:44+5:302020-11-19T19:58:07+5:30
Health Tips in Marathi :एनल्स ऑफ अमेरिकन थायरोसीस सोसायटीमध्ये एका नवीन संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
कोरोनाकाळात मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. मास्कचा वापर जेव्हा लोक करतात तेव्हा हसताना, बोलताना, शिंकताना एकाकडून इतरांमार्फत होणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होते. पण मास्कचा सतत वापर केल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न होणं, शारीरिक क्रिया करताना त्रास होणं. अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशी भीतीसुद्धा लोकांच्या मनात आहे.
एनल्स ऑफ अमेरिकन थायरोसीस सोसायटीमध्ये एका नवीन संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले आहे. अमेरिकन आणि कॅनेडियन संशोधकांच्या एका टीमने असा निष्कर्ष काढला आहे की डिस्पेनिया हा आजार वाढत असताना मास्क परिधान केल्याने फुफ्फुसाचा त्रास कमी होतो. मास्कच्या वापरामुळे होणारे परिणाम उदा, श्वसनाच्या क्रियेवर परिणाम होणं, ऑक्सिजनची पातळी कमी होणं. यांची तीव्रता ही खूप कमी असते. अनेकदा याचे परिणाम नगण्य असतात.
तुम्हाला डायबिटीस असेल तर मुलांना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
अभ्यासाचे पहिले लेखक एमडी, पीएचडी सुसान हॉपकिन्स हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसीन येथील औषध आणि रेडिओलॉजीचे प्राध्यापक आहेत. याशिवाय मास्कचा वापर केल्याने विशिष्ट स्थितीत लोकांना व्यायाम करताना त्रासाचा सामना करावा लागतो असे दिसून आलेले नाहीत. तज्ज्ञांनी नमूद केले की कदाचित तीव्र हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असलेल्या व्यक्तींमध्ये श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
काळजी वाढली! कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं
या काळात ज्या लोकांना व्यायाम करताना अस्वस्थ वाटते त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करायला हवी. या अभ्यासात श्वासोच्छवासाचे कार्य (श्वास घेण्यास आणि श्वासोच्छवासासाठी खर्च केलेली ऊर्जा), धमनी, रक्त वायू, स्नायूंच्या रक्तप्रवाहावर होणारा परिणाम, थकवा, ह्रदयाचे कार्य आणि मेंदूमधील रक्त प्रवाह यासारख्या अनेक घटकांचे मूल्यांकन केले होचे. हॉपकिन्स म्हणाले, ''फेसमास्क परिधान करणे अस्वस्थ होऊ शकते. श्वासोच्छवासाची क्रिया वेगाने होऊ शकते. त्यासाठी तुम्ही काहीवेळासाठी मास्क काढून पुन्हा वापरू शकता. व्यायाम करत असताना मास्क वापरल्याने जास्त घाम येऊ शकतो. ''