मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:30 PM2022-11-16T17:30:30+5:302022-11-16T17:31:39+5:30

मुंबईत गोवर या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला आहे. सध्या मुंबईत एकूण ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४ बालकांचा मृत्यु झाला आहे. 

measles-outbreak-in-mumbai-read-about-this-disease-more | मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या

मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या

googlenewsNext

मुंबईत गोवर या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला आहे. सध्या मुंबईत एकूण ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४ बालकांचा मृत्यु झाला आहे.  प्रामुख्याने १ वर्षापर्यंतच्या बालकांना हा रोग होत असून पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. त्यासाठी आधी गोवर हा रोग नेमका काय आहे, त्याची लक्षणे काय आणि उपाय काय हे समजुन घ्या

गोवर रोगाविषयी माहिती 

गोवर हा संसर्गजन्य रोग असून वेगाने पसरणारा आहे. हा विषाणू सर्वात आधी श्वसनमार्गात अडथळे आणतो. देशात ० ते ५ वर्षे मुलांना गोवर होण्याचे प्रमाण अधिक आहे. गोवर विषाणू उष्ण वातावरणात फार काळ तग धरु शकत नाही. थंड वातावरणात तो बराच काळ टिकू शकतो. म्हणूनच हिवाळ्यात गोवर रोग पसरतो. गोवर श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर रसग्रंथी, टॉन्सिल, श्वसननलिकांवर परिणाम करतो. 

लक्षणे कोणती 

गोवर रोगाचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे अंगावर लाल चट्टे, पुरळ येणे

मुलांना सर्दी, खोकला, ताप हे सामान्य आजार होतात

अशक्तपणा येतो

श्वास घेण्यास त्रास होतो

यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास पालकांनी मुलांना तातडीने रुग्णालयात घेऊन जावे. 

गोवर रोगावर उपाय कोणते 

गोवर वर लस काही वर्षांपुर्वीच आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लसीच्या वेळापत्रकानुसार बालकांचे न चुकता लसीकरण करावे. आधी ९ महिने आणि त्यानंतर १६ महिन्यांच्या बालकांचे लसीकरण पूर्ण करुन

ताप आला असल्यास त्वरित उपचार करावे. ताप वाढू नये म्हणून औषध घ्यावे 

गोवर रुग्णाांना व्हिटॅमिन ए दिले जाते.  

Web Title: measles-outbreak-in-mumbai-read-about-this-disease-more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.