#Bestof2018 : वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी; अनेक गंभीर आजारांवर संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 02:38 PM2018-12-21T14:38:27+5:302018-12-21T14:38:49+5:30
कॅन्सर, डायबिटीज, डिप्रेशन, मायग्रेन, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये या आजारांसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वाढता धोका पाहता उपलब्ध असलेली औषधं पुरेशी नाहीत.
कॅन्सर, डायबिटीज, डिप्रेशन, मायग्रेन, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये या आजारांसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वाढता धोका पाहता उपलब्ध असलेली औषधं पुरेशी नाहीत. वैद्यकिय क्षेत्रामध्ये संशोधक नवनव्या अभ्यांसांमार्फत अनेक नवनवीन संशोधनं करत असतात. या वर्षी म्हणजेच 2018मध्ये नवीन औषधं आणि उपचारांचा शोध घेण्यात आला त्यामध्ये कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कार्डियोवॅस्कुलर डिजीज आणि मेंटल हेल्थशी निगडीत अनेक आजारांचा समावेश होतो. जाणून घेऊया या वर्षात मेडिकल क्षेत्रामधील बदलांबाबत...
1. कॅन्सरवर नवीन उपचार
जानेवारी, 2018 मध्ये स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी घोषणा केली होती की, कॅन्सरच्या उपचारासाठी एक नवी लस शोधण्यात आली आहे. ज्यामुळे लिम्फोमाच्या रूग्णांना फायदा होऊ शकतो. संशोधकांनी सर्वात आधी उंदरांवर संशोधन केलं असून ती टेस्ट यशस्वी झाल्याचंही सांगितलं होतं.
2. कार्डियोवॅस्कुलर आजारावर औषध
सप्टेंबर, 2018मध्ये बायोफर्मास्यूटिकल कंपनी, बायोटेक अमरीनने वाससेपा नावाच्या औषधाची घोषणा केली होती की, जे कार्डियोवॅस्कुलर आजाराचा धोका 25 टक्के कमी होऊ शकतो.
3. पहिल्यांदा फेस ट्रान्सप्लांटची यशस्वी सर्जरी
एप्रिल, 2018मध्ये फ्रान्सच्या 43 वर्षीय जेरोम हॅमन यांच्यावर दोनदा फेस ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली. या व्यक्ती न्यूरोफिब्रोमॅटेसिस टाइप 1 ने पीडित आहे. हा एक जेनेटिक आजार असून यामुळे पीडित व्यक्तीच्या चेहऱ्याचा आकार वाढू शकतो.
4. मायग्रेनपासून सुटका करणारं इन्जेक्शन
मे, 2018मध्ये खाद्य आणि औषध प्रशासन (एफडीए) ने मायग्रेनपासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरणारं इन्जेक्शन एमोविगला मंजूरी देण्याची घोषणा केली.
5. मेल बर्थ कंट्रोल पिल्स
आता फक्त महिलांसाठीच नाही तर पुरूषांसाठीही बर्थ कंट्रोल पिल्स उपलब्ध झाल्या आहेत. कारण मार्चमध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी मेल बर्थ पिल्स तयार केल्या आहेत. ज्या फायदेशीर देखील ठरतं आहेत.
6. डिप्रेशनसाठी केटामाइन औषधाचा शोध
मागील 30 वर्षांमध्ये डिप्रेशनवर उपचार म्हणून करण्यात आलेलं एक संशोधन यशस्वी झालं. केटामाइन औषधाला 'पार्टी ड्रग' म्हणूनही ओळखण्यात येतं. अॅन्टीड्रिप्रेसेंट तयार करणाऱ्या मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक जॉनसन अॅन्ड जॉन्सनने मे, 2018मध्ये हे संशोधन प्रस्तुत केलं.
7. ब्लड ग्लुकोजच्या तपासणीसाठी स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स
डायबिटीजच्या रूग्णांना ब्लड ग्लुकोज लेव्हलची सतत तपासणी करणं गरजेचं असतं. आता यासाठी सतत ब्लड टेस्ट करण्याची गरज भासणार नाही. दक्षिण कोरियामध्ये उल्सान नेशनल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांच्या एका टिमने डायबिटीजच्या रूग्णांसाठी ग्लूकोजची पातळी ओळखण्यासाठी उपयोगी अशा कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला.
8. ब्रेस्ट आणि ओवेरियन कॅन्सरसाठी पीएआरपी इन्हिबिटर्स
ऑक्टोबरमध्ये एस्ट्राजेनेकाचं लिनपरजा नावाच्या एका औषधाचा शोध लावण्यात आला आहे. जे ओवरियन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतं. पीआरपी, पॉली-एडीपी रिबोस पॉलिमरेज तसेच व्यक्तीच्या पेशींमध्ये आढळून येणारं प्रोटीन असतं जे डॅमेज डीएनए सेल्सला रिपेअर करण्यासाठी मदत करतं. पीआरपी औषध ब्रेस्ट आणि ओवेरियन कॅन्सरवरही उपायकारक ठरू शकतात.
9. पहिल्यांदा अवयव दानातून प्राप्त गर्भाशयातून प्रत्यारोपणातून बाळाचा जन्म
जगात पहिल्यंदाच एका मृत महिलेच्या अवयवदानातून प्राप्त झालेल्या गर्भाशय प्रत्यारोपणानंतर ब्राझीलच्या एका महिलेने बाळाला जन्म दिला. 'लांसेट'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, एका अवयवदान करणाऱ्या मृत महिलेच्या गर्भाशयाचे प्रत्यारोपण करून एका गर्भाशयाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या महिलेने बाळाला जन्म दिला.
10. स्ट्रोकसाठी डीबीएसचा शोध
मे, 2018मध्ये नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने क्लीवलॅन्ड क्लिनिकच्या संशोधकांच्या टीमला 2.2 मिलियन यूएस डॉलरने सन्मानित केलं होतं. जेणेकरून ते स्ट्रोकच्या रूग्णांमध्ये डीबीएसच्या फायद्यासाठी आणि जास्तीत जास्त रिसर्च करू शकतील. या टिमने डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस)चा उपयोग करून स्ट्रोकच्या सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका 59 वर्षीय महिलेवर डीबीएसचं परिक्षण केलं ज्यामध्ये इस्कॅमिक स्ट्रोक झाल्यानंतर हेमिपरिसिसचा अनुभव घेतला.