'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 11:18 AM2019-10-11T11:18:21+5:302019-10-11T11:19:11+5:30

सामान्यपणे एकदा हार्ट अटॅक आल्यावर रूग्ण आयुष्यभर औषधे घेतात, ज्यांचा काही खास प्रभाव पडत नसतो. अशात हे औषध फायदेशीर ठरू शकतं. 

Medication to prevent heart attack it works on the basis of body clock | 'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम!

'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम!

Next

(Image Credit : drugtargetreview.com)

कॅनडातील University of Guelph मधील वैज्ञानिकांनी एक असं औषध तयार केलंय ज्याने हार्ट अटॅक आणि हार्ट फेलचा धोका टाळला जाऊ शकतो. या औषधाने हार्ट फेल टाळण्यासोबतच त्या औषधांची गरजही कमी होईल, जे रूग्ण हार्ट फेलचा धोका टाळण्यासाठी घेतात. सामान्यपणे एकदा हार्ट अटॅक आल्यावर रूग्ण आयुष्यभर औषधे घेतात, ज्यांचा काही खास प्रभाव पडत नसतो. अशात हे औषध फायदेशीर ठरू शकतं. 

हे औषध आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ म्हणजे बॉडी क्लॉकच्या आधारावर काम करतं. ज्याला सकॅडियन रिदम असंही म्हटलं जातं. बॉडी क्लॉकमध्ये जीन आणि प्रोटीन असतात. जे २४ तास रात्रंदिवस हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवतात. बॉडी क्लॉकचं मेकॅनिज्म हृदयात हेल्दी रक्तप्रवाह कंट्रोल करते.  

हार्ट फेलचा धोका कमी करू शकतं

युनिव्हर्सिटीतील अभ्यासक टॅमी मार्टिनो म्हणाले की, हा रिसर्च फारच रोमांचक आहे. कारण याने एका उपचारावर जोर दिला जातो, ज्याने हार्ट अटॅक तर ठीक होतोच, सोबतच हार्ट फेलचा धोका वाढण्याची शक्यताही रोखली जाऊ शकते. 

ते म्हणाले की, आम्ही एसआर 90009 नावाच्या या औषधाचा प्रयोग उंदरांवर केला आणि आम्हाला असं आढळलं की, या औषधाने त्यांच्या शरीरात एनएलआरपी ३ इनफ्लेमेसम नावाचं सेल्युलर सेंसरची निर्मिती कमी झाली. हे सेंसर हृदयाच्या टिश्यूजला नुकसान पोहोचवतात. अशात या औषधाने हृदयाच्या टिश्यूजला काहीच नुकसान न पोहोचल्याने हृदयावर काहीच आघात झाला नाही आणि उंदरांना हार्ट अटॅकही आला नाही.

यातून हे स्पष्ट होतं की, या औषधाने हृदयाला कोणतंही नुकसान होणार नाही आणि भविष्यात लोक निरोगी जीवन जगू शकतात. तसे आम्ही परिक्षणादरम्यान या औषधाची कार्यप्रणाली पाहून हैराण झालो. कारण हे औषध फार वेगाने काम करत होतं. या रिसर्चमुळे हृदयाच्या इतर रोगांच्या उपचारातही मदत होईल. या रिसर्चचे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.


Web Title: Medication to prevent heart attack it works on the basis of body clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.