वर्कआउट करताना 'या' औषधांचं सेवन पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 10:30 AM2018-12-12T10:30:41+5:302018-12-12T10:34:48+5:30

जर तुम्ही योग्य पद्धतीने वर्कआउट केलं तर तुम्हाला हवे ते परिणाम मिळू शकतात. पण काही लोक घाईगडबडीत योग्य रुटीन फॉलो करण्याऐवजी औषधांचा वापर करतात आणि यामुळेच त्यांच्या प्रयत्न निष्फळ ठरतात.

Medications side effects during workout | वर्कआउट करताना 'या' औषधांचं सेवन पडू शकतं महागात!

वर्कआउट करताना 'या' औषधांचं सेवन पडू शकतं महागात!

Next

जर तुम्ही योग्य पद्धतीने वर्कआउट केलं तर तुम्हाला हवे ते परिणाम मिळू शकतात. पण काही लोक घाईगडबडीत योग्य रुटीन फॉलो करण्याऐवजी औषधांचा वापर करतात आणि यामुळेच त्यांच्या प्रयत्न निष्फळ ठरतात. अशात वर्कआउट करताना कोणत्या औषधांचा वापर करु नये याबाबत तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. याबाबतची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

निरोगी आणि फिट राहण्यासाठी वर्कआउट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्यप्रकारे वर्कआउट कराल तर तुम्हाला हवा तो फायदा बघायला मिळू शकतो. पण काही लोक वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी औषधांचं सेवन करत असतात. पण काही औषधांचा वर्कआउट करताना चुकूनही वापर करुन नये असं तज्ज्ञ सांगतात. कारण या औषधांमुळे डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर आणि ओव्हरहिटींगसारख्या इतरही काही समस्या होऊ शकतात. 

Any kind of physical activity is beneficial for you | आरोग्यसंबंधी नवीन गाइडलाइन, लहान मुलांसाठीही आहे गरजेची!(Image Credit : ori-healthy.com)

औषधे तुमचं वर्कआउट कसं प्रभावित करतात

सेलेक्टिव सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर्ट हे औषध तणाव आणि चिंतेची लक्षणे कमी करण्यासाठी वापरली जातात. पण वर्कआउट करताना या औषधाचं सेवन केल्यास तुमच्या शरीराची ऊर्जा प्रभावित होते. शरीराची ऊर्जा प्रभावित झाल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण वर्कआउटसाठी ऊर्जा सर्वात महत्त्वाची ठरते. 

बेंजोडायजेपाइन्स

चिंता आणि पॅनिक डिसऑर्डरवर उपचार करण्यासाठी बेंजोडायजेपाइन्स या औषधाचं सेवन केलं जातं. एका वर्कआउटचं रुटीन फॉलो करत असताना या औषधाचं सेवन केल्यास थकवा, उदासीनता, मांसपेशींमध्ये समस्या आणि ऊर्जा कमी होणे या समस्या होऊ शकतात. 

झोपेच्या गोळ्या

अनेक वयस्क लोक हे झोप न लागण्याच्या समस्ये हैराण आहेत. अशात ते यावर उपाय म्हणून झोपेच्या गोळ्यांचं सेवन करतात. पण झोपेच्या गोळ्यांमुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुस्ती जाणवू शकते. जर तुम्हाला वर्कआउट करताना सुस्ती जाणवली तर तुम्ही अर्थातच योग्यप्रकारे वर्कआउट करु शकणार नाहीत.  

(Image Credit : www.bustle.com)

अॅलर्जीची औषधे

अॅलर्जीच्या औषधांमुळे तुम्हाला जास्त आळस जाणवू शकतो. त्यासोबतच वर्कआउट रुटीनदरम्यान तुम्ही अॅलर्जीच्या औषधांचा वापर केला तर याने शरीरात तापमान वाढतं आणि जास्त घाम येतो. त्यामुळे काही औषधे आणि वर्कआउट करण्यापूर्वी योग्य माहिती घेणेही गरजेचे आहे. कारण काही औषधांमुळे तुमची वर्कआउटची मेहनत पाण्यात जाऊ शकते. 

कोणतीही गोष्ट करताना काही नियम पाळणे गरजेचे असते. तेच वर्कआउटबाबतही लागू पडतं. जर तुम्हाला वर्कआउटचे योग्य परिणाम हवे असतील तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे किंवा कोणतीही गोष्ट करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचं असतं. हेच या औषधांबाबतही सांगता येईल. ही औषधे वाईट आहेत असा याचा अर्थ होत नाही. पण वर्कआउट रुटीन फॉलो करत असताना या औषधांमुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात. 

Web Title: Medications side effects during workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.