उन्हाळ्यात मिळणा-या करवंदाचे औषधी गुण माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 10:38 AM2018-04-28T10:38:19+5:302018-04-28T10:42:57+5:30
करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो. तसंच यात हा आरोग्यासाठीही मोठा गुणकारी आहे. चला जाणूल घेऊया या फळाचे फायदे.
मुंबई : वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी फळे येतात. या फळांची चव तर चाखण्याचा भरपूर आनंद लोक घेतांना दिसतात. पण अनेकांना त्या फळातील औषधी गुण माहीत नसतात. असंच एक अनेकांच्या आवडीचं फळ म्हणजे करवंद. करवंद महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो. तसंच यात हा आरोग्यासाठीही मोठा गुणकारी आहे. चला जाणूल घेऊया या फळाचे फायदे.
1) करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचाविकारावर करवंद उपयुक्त आहे. याच्या चुर्णाने मधुमेह आटोक्यात आणण्यास उपयोग होतो.
2) करवंदामध्ये मोठया प्रमाणात सायट्रिक अँसिड असतं. त्यामुळे या दिवसांत उष्णतेमुळे होणार्या अनेक आजारांवर करवंद फायदेशीर आहेत.
(उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे)
3) एक महिना करवंदाचे सेवन केल्यास किंवा ज्यूस पिल्यास शारीरिक ताकद वाढते.
4) या दिवसांत उष्णतेमुळे शरीराची काहिली होते तेव्हा करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो.
5) करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
(रोज डाळ-भात खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत?)
6) करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत.