एक असा गंभीर आजार ज्यावर नाही औषध, लक्षणं दिसताच लगेच करा 'हे' खास उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 05:11 PM2024-02-20T17:11:11+5:302024-02-20T17:12:37+5:30
जर तुम्हाला तणावापासून बचाव करायचा असेल तर तुमच्या आहारात नॅचरल औषधांचा समावेश करा.
Foods To Fight Stress : तणाव आजकालच्या जीवनात एक मोठी समस्या बनत चालला आहे. अलिकडे तरूण लोकच नाही तर लहान मुलेही तणावाचे शिकार होतात. जर तुम्हाला तणावापासून बचाव करायचा असेल तर तुमच्या आहारात नॅचरल औषधांचा समावेश करा.
कोणत्या आजारावर नाही औषध?
वायरलपासून ते कॅन्सरपर्यंत अनेक असे गंभीर आजार नष्ट करण्यासाठी औषधं आहेत. पण एक असा आजार आहे ज्यावर औषध काम करत नाही. अनेक एक्सपर्ट्स स्ट्रेसला एक महामारी मानतात. याच्या केवळ लक्षणांना मॅनेज करणारी औषधे आहेत. पण अशा आजारांवर उपाय शरीर स्वत: करू शकतं. तो उपाय खाण्याद्वारे पोषक मिळवणं.
ही लक्षणं दिसली तर...
क्लीवलॅंड क्लिनिकनुसार, छातीत वेदना, जडपणा, धडधड वाढणे, वेदना, डोकेदुखी, थरथरी, हाय ब्लड प्रेशर, मसल्समध्ये वेदना, जबडा दुखणे, पोटाची समस्या, लैंगिक समस्या, कमजोर इन्युनिटी स्ट्रेसचे शारीरिक लक्षणं आहेत.
काय कराल उपाय?
हार्वर्ड हेल्दी आणि बॅलंस्ड डाएटला तणावासोबत लढण्यास हत्यार मानलं जातं. अनेक रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, काही खास प्रकारचे पोषक तत्व स्ट्रेसमुळे डॅमेज झालेल्या सेल्सना रिपेअर करतात. तेच काही न्यूट्रिएंट तणाव वाढवणाऱ्या कोर्टिसोल हर्मोन्सची लेव्हल कमी करतात. चांगल्या प्रभावासाठी डीप ब्रीदिंग, एक्सरसाइज सारखे इतर उपायही करत रहा.
रताळे
रताळ्यांची टेस्ट जेवढी चांगली लागते तेवढेच त्याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. याच्या सेवनाने कोर्टिसोल हॉर्मोनची लेव्हल कमी होते. यात स्ट्रेस रिस्पॉन्ससोबत लढणाऱ्या इम्यून सिस्टीमला मजबूत करणारे व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम इत्यादी तत्व असतात.
लसूण
लसणांमध्ये इतके औषधी गुण असतात की, तुम्ही हे खाऊन अनेक गंभीर आजारांना दूर करू शकता. यात सल्फप कंपाउंड असतात जे ग्लूटायथियोनची लेव्हल वाढवतात. स्ट्रेससोबत लढण्यासाठी शरीर सगळ्यात आधी याच गोष्टीचा वापर करतं.
सूर्यफुलाच्या बीया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये शक्ती आणि मजबूती असते. जी तणावासोबत लढण्यास कामी येते. यात पावरफुल व्हिटॅमिन्स ई असतं जे एक अॅंटी-ऑक्सिडेंट आहे जे मेंटल हेल्थसाठी गरजेचं असतं. सोबतच क्रॉनिक स्ट्रेस, एंग्जायटी आणि डिप्रेशनचा धोकाही कमी करतं.
या गोष्टींचंही करा सेवन
ब्रॉकली, छोले, ब्लूबेरी, कॅमोमाइल टी, साल्मन मासे इत्यादी एंटी स्ट्रेस फूड्स आहेत जे मेंटल हेल्थला एक वेगळ्या लेव्हलवर नेऊ शकतात.