कोरोना काळात ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी गुड न्युज! रोगप्रतिकारकशक्ती कमालीची वाढते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:54 PM2021-12-28T17:54:13+5:302021-12-28T17:54:43+5:30

ध्यानादरम्यान, रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य गतिमान होते आणि त्यात दाहक सिग्नल सक्रिय होत नाहीत. अशा प्रकारे, ध्यान कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली बरे करण्यास मदत करते.

meditation improves your immunity power says study | कोरोना काळात ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी गुड न्युज! रोगप्रतिकारकशक्ती कमालीची वाढते

कोरोना काळात ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी गुड न्युज! रोगप्रतिकारकशक्ती कमालीची वाढते

Next

अलीकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या जीनोमिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सखोल ध्यान म्हणजेच अ‍ॅडवांस्ड मेडिटेशन रोगप्रतिकारक प्रणालीच्या क्रियाकलापांशी संबंधित आहे. यूएसएच्या ओरेगॉन युनिव्हर्सिटीच्या (University of Oregon) शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासात, अ‍ॅडवांस्ड मेडिटेशनशी संबंधित ट्रान्सक्रिप्शनल प्रोग्रामची (transcriptional program) ओळख आणि स्वरूप याबद्दल माहिती गोळा केली गेली आहे. यासोबतच बायोइन्फर्मेटिक्सच्या माध्यमातून ध्यानाशी संबंधित विविध नेटवर्क्स एकत्रित करण्यात आल्या. हे कोर नेटवर्क विविध रोगप्रतिकारक सिग्नलच्या मार्गांद्वारे जोडलेले आहेत.

योग आणि ध्यानाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणामांबद्दल (Physical And Mental Health) पूर्वीच्या अनेक अभ्यासांमध्ये सांगितला गेले आहे. परंतु, त्यात असलेली आण्विक यंत्रणा आणि महत्त्वाच्या जनुकांचे योगदान अद्याप व्यापकपणे समजलेले नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (Proceedings of the National Academy of Sciences), यूएसएच्या पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. (Deep meditation is helpful for immune system)

संशोधन कसे झाले?
संशोधकांनी सांगितले की, ही कोर ट्रान्सक्रिप्शनल प्रोफाइल (core transcriptional profile) मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजेच मेंदू आणि स्पाइनल कॉर्डशी संबंधित रोग आणि कोविड-19 संसर्गादरम्यान निष्क्रिय होते. या अभ्यासासाठी, सुमारे ४० वर्षे वयोगटातील १०६ स्वयंसेवकांच्या रक्ताच्या नमुन्यांचे जीनोमिक आणि जैव सूचनात्मक विश्लेषण करण्यात आले. ते सर्व सखोल परित्याग ध्यान (मेडिटेशन) च्या अमलात होते. ज्यामध्ये त्यांनी ८ दिवस दिवसातील १० तासांपेक्षा जास्त शांततेत घालवले.

विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, ध्यानानंतर प्रतिकारशक्तीशी संबंधित २२० जीन्सच्या अभिव्यक्तीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये इंटरफेरॉन सिग्नलिंगशी संबंधित ६८ जनुकांचा समावेश आहे, परंतु दाहक जनुकांच्या अभिव्यक्तीमध्ये कोणताही बदल झाला नाही. संशोधकांना त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षात असेही आढळून आले की ध्यानादरम्यान, रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य गतिमान होते आणि त्यात दाहक सिग्नल सक्रिय होत नाहीत. अशा प्रकारे, ध्यान कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली बरे करण्यास मदत करते.

Web Title: meditation improves your immunity power says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.