चिंताजनक! पुन्हा स्वरूप बदलणार ब्रिटनमधील कोरोना व्हायरसचा स्ट्रेन; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:13 PM2021-02-03T14:13:22+5:302021-02-03T14:35:14+5:30
CoronaVirus News & Latest Updates : सध्या उपलब्ध असलेल्या लसी या व्हायरसला प्रतिबंधित करण्यात कमी प्रभावी ठरतील.
एक वर्षानंतरही कोरोनाचा प्रसार अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की दक्षिण इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी समोर आलेल्या कोरोना विषाणूच्या अत्यंत संक्रामक आणि अधिक प्राणघातक प्रकारात बदल होण्याची शक्यता आहे. चाचणी दरम्यान, इंग्लंडमध्ये आढळलेल्या विषाणूच्या स्वरूपात देखील बदल आढळला आणि त्याचे नाव 'ई 484K के' आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमध्येही कोरोना विषाणूच्या प्रकारात होणारे बदल आढळून आले. अशी भीती व्यक्त केली जात आहे की व्हायरसच्या रूपात होणारा हा बदल रोगप्रतिकारक प्रणालीत प्रवेश करू शकतो आणि सध्या उपलब्ध असलेल्या लसी या व्हायरसला प्रतिबंधित करण्यात कमी प्रभावी ठरतील.
केंब्रिज विद्यापीठातील केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ थेरपीटिक इम्युनोलॉजी अॅण्ड इन्फेक्टीव्ह डिसीज (सीआयटीआयडी) येथे केलेल्या संशोधनाचे अद्याप विश्लेषकांकडून पुनरावलोकन झाले नाही. राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेच्या समन्वयाने संशोधकांनी हे संशोधन केले आहे. सीआयटीआयडीचे एक प्रमुख संशोधक रवी गुप्ता म्हणाले, ''सर्वात चिंताजनक म्हणजे ई 4844 विषाणूचा एक प्रकार आहे, ज्याचा संसर्ग आजपर्यंत फारच कमी लोकांना आढळला आहे. आमच्या संशोधनात असे सूचित केले आहे की या स्वरुपावर लस कमी प्रभावी होईल. ते म्हणाले की विषाणूची ही पद्धतही बदलत आहे, ही चिंतेची बाब आहे.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''नवीन व्हायरसचे स्वरूप पाहता पुढच्या पीढीसाठी तयारी करणं गरजेचं आहे. संक्रमण रोखण्यासाठी लसीकरणाच्या कामात वेग आणायला हवा. या संशोधनाचे प्रमुख संशोधनकर्ता डॉ. हमी कोलियर यांनी सांगितले की, आमच्या आकडेवारीवरून दिसून येतं की, ८० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लस सगळ्यात आधी द्यायला हवी. तीन आठवड्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार होण्यास मदत होईल. ''
पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार; आरोग्यमंत्र्याचा धोक्याचा इशारा
सौदी अरेबियात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियान सुरू असतानाच माहामारीच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. आरोग्यमंत्री तैफिन अल रबिया यांनी दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच लोकांनी माहामारीचा प्रसार थांबवण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. दर आठवड्याला संक्रमणाच्या नवीन केसेस समोर येत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संक्रमणाच्या प्रकरणात २०० टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. याचे प्रमुख कारण सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या सभा हे होतं. बीपीच्या समस्यांना लांब ठेवतील नाष्त्यातील हे पदार्थ; अचानक बीपी हाय होण्याचा धोका होईल कमी
सौदी अरेबियामध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणं अशीच घटना वाढत राहिल्यास बर्याच देशांना यापूर्वी सामोरे गेलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. असा इशारा आरोग्यमंत्री तौफिग अल रबिया यांनी दिला. ते म्हणाले की, ''जर कोरोनाच्या बचाव उपायांकडे दुर्लक्ष केले गेले तर आम्हाला नक्कीच कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करावा लागेल.'' सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी येथे कोरोना संसर्गाची २५५ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर एका महिन्यापूर्वी दररोज केवळ ८० प्रकरणांची नोंद झाली आहे. सध्या येथे कोरोना संसर्ग तीन लाख ६८ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर सहा हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. बीपीच्या समस्यांना लांब ठेवतील नाष्त्यातील हे पदार्थ; अचानक बीपी हाय होण्याचा धोका होईल कमी