ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस दूर करायचाय? असं करा मॅनेजमेंट...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 10:02 AM2020-01-24T10:02:51+5:302020-01-24T10:02:59+5:30
धावपळीच्या जीवनात नेहमीच अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला सलग २४ तास काम करावं लागतं.
धावपळीच्या जीवनात नेहमीच अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला सलग २४ तास काम करावं लागतं. सध्या दिवस आणि रात्रीतील फरक दूर करणाऱ्या वर्क कल्चरमुळे कामाच तणाव आणि परिवाराशी संबंधित समस्यांमुळे स्ट्रेस येणं सामान्य बाब झाली आहे. अनेकदा फॅमिली लाइफ कूल असते, पण वर्किंग प्लेसमधील वातावरण तुमचा स्ट्रेस अधिक वाढवतं. मग अशात स्ट्रेस मॅनेज कसा करायचा याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बॉससोबत शेअर करा
(Image Credit : mojarradi.com)
जर तुम्हाला वाटत असेल की, ऑफिस वर्कशी संबंधित तणाव तुम्हाला हैराण करत असेल आणि तुम्ही कामावर फोकस करू शकत नसाल तर तुम्ही याबाबत तुमच्या बॉससोबत बोललं पाहिजे. तुमची बोलण्याची पद्धत आणि समस्या दोन्ही गरजेच्या असल्या पाहिजे.
कामाची वेळ डिवाइड करा
(Image Credit : medicalnewstoday.com)
वर्क स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी सर्वाधिक गरजेचं आहे की, कोणतं काम तुम्हाला किती वेळेत संपवायचं आहे. अशाप्रकारे नियोजन करून काम कराल तर तुम्हाला कामाचा स्ट्रेस येणार नाही. त्यामुळे तुम्ही कामावर अधिक फोकस करू शकाल.
छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्या
(Image Credit ; gulfnews.com)
ऑफिसमध्ये वेगवेगळ्या विचारांचा, वेगवेगळ्या स्वभावांची लोकं असणारच. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा स्वत:ला त्रास होऊ देऊ नका. तुम्ही ऑफिसमध्ये काम करण्यासाठी येता त्यामुळे कामावर अधिक फोकस करा. छोट्या छोट्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्याल तर तेवढा जास्त तुम्हाला त्रास होईल.
टेक्नॉफ्रेन्डली व्हा
आजच्या काळात टेक्नॉलॉजीचा वापर केवळ काम लवकर करण्यासाठी नाही तर तणाव दूर करण्यासाठी देखील केला जातो. अशावेळी तुम्ही ऑफिसच्या आणि घरच्या कामात मदत होईल अशा अॅप्सची मदत घेऊ शकता. हे अॅप्स तुम्हाला योग्य ती माहिती देऊ शकतात. तसेच कुणाला काही विचारण्यासाठी लाजू नका. याने फायदा तुमचाच होणार आहे.
तुमचं काम आणि सोशल मीडिया
(Image Credit : patientpop.com)
तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर सोशल मीडियाचा वापर टाळावा. जर सोशल मीडियाशी संबंधित तुमचं काम नसेल तर ते वापरूच नका. काम एकदा जर तुम्ही यात एंगेज झालात तर तुमची कामे तशीच राहतील आणि तुमचा स्ट्रेस वाढेल.