'या' टिप्स वापरून पुरूष वाढत्या वयातही दिसू शकतात तरूण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:06 PM2023-08-18T15:06:35+5:302023-08-18T15:06:49+5:30

Men's Grooming : केवळ व्यायामाने हे होत नाही. दैनंदिन जीवनात काही आणखीही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही वाढत्या वयाचा प्रभाव कमी करु शकता. 

Men can stay young and fit in old age with these tips | 'या' टिप्स वापरून पुरूष वाढत्या वयातही दिसू शकतात तरूण!

'या' टिप्स वापरून पुरूष वाढत्या वयातही दिसू शकतात तरूण!

googlenewsNext

Men's Grooming : काही टिप्सच्या माध्यमातून वाढत्या वयाचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. म्हणजे या टिप्सच्या माध्यमातून तुमचं वाढतं वय लपवलं जाऊ शकतं. वयाचा प्रभाव चेहऱ्यावरुन आणि शरीरावरुन कमी करण्यासाठी काही गोष्टींची खास काळजी घेणे गरजेचे आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून समोर आले आहे की, वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी धावणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. धावण्यासोबतच स्वीमिंग आणि सायकल चालवणे देखील तुमचं वाढतं लपवू शकतात. पण केवळ व्यायामाने हे होत नाही. दैनंदिन जीवनात काही आणखीही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही वाढत्या वयाचा प्रभाव कमी करु शकता. 

एक्सरसाइजची योग्य निवड

तुम्ही जितकी जास्त फिजिकल अॅक्टिविटी वाढवाल तितके तुम्ही फिट आणि एनर्जेटिक दिसाल. यासाठी तुम्ही रोज एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. याने शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो आणि चेहऱ्यावर चमच कायम राहते. रोज ३० ते ४५ मिनिटे एक्सरसाइज केवळ वजन कमी करण्यातच मदत करत नाही तर याने तुम्ही फिट राहता, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचाही हेल्दी राहते. 

त्वचेची काळजी 

वय वाढल्याचा सर्वात पहिला प्रभाव आपल्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर दिसतो. अशात या गोष्टींची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी रोज चेहरा फेसवॉशने धुवावा. त्यानंतर मॉइश्चरायजरचा वापर करावा. जर डोळ्यांखाली डार्क सर्कल झाले असतील तर यासाठी अंडर आय क्रीमचा वापर करा. 

चेहऱ्यावरील केस

जर चेहऱ्यावर फार जास्त केस असतील तर रोज शेविंग करा. तुम्हाला बिअर्ड लूक पसंत असेल तर तुम्ही दाढी चांगल्याप्रकारे ट्रिम करावी. पण दाढीच्या केसांची स्वच्छता नियमीत करा. कारण यात दिवसभर धूळ जमा झालेली असते आणि याने त्वचेचा संक्रमण होण्याचा धोका असतो. 

दातांची काळजी

चेहऱ्याच्या स्वच्छतेसोबत आणि स्टायलिंगसोबतच दातांची काळजीही फार महत्त्वाची आहे. यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळी ब्रश करावा. कधी कधी माऊथ वॉशचाही वापर करावा. काहीही खाल्ल्यानंतर गुरळा करायला विसरु नका. मोहरीच्या तेलात मीठ मिश्रित करुन हिरड्यांची मालिश करा.

Web Title: Men can stay young and fit in old age with these tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.