डायबिटीसच्या रूग्णांबाबत रिसर्चमधून धक्कादायक खुलासा, 'या' आजारांचा जास्त असतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:01 AM2024-05-27T10:01:29+5:302024-05-27T10:02:00+5:30
Health Research : या रिसर्चनुसार, डायबिटीस असलेल्या पुरूषांना महिलांच्या तुलनेत दुसऱ्या गंभीर आजारांचा धोका जास्त असतो.
Health Research : जगभरात जास्तीत जास्त लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत. डायबिटीस हा वाढत्या वयात होणारा आजार असं मानलं जातं होतं. पण आता कमी वयातही हा आजार होत आहे. नुकताच डायबिटीसबाबत एक रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चनुसार, डायबिटीस असलेल्या पुरूषांना महिलांच्या तुलनेत दुसऱ्या गंभीर आजारांचा धोका जास्त असतो.
सिडनी यूनिवर्सिटीमधील अभ्यासकांनुसार, डायबिटीसमध्ये हार्ट, पाय, किडनी आणि डोळ्यांमध्ये होणाऱ्या आजारांचा धोका महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधित असतो.
हा रिसर्च 25, 713 लोकांवर करण्यात आला. यातील सगळ्यांची वयं 45 पेक्षा जास्त होती आणि ते टाइप 1 व टाइप 2 डायबिटीसने पीडित होते. या लोकांवर सर्वेच्या माध्यमातून डायबिटीसमुळे विकसीत झालेल्या आरोग्यासंबंधी समस्यांवर 10 वर्ष लक्ष ठेवण्यात आले. नतर हा डेटा त्यांच्या मेडिकल रेकॉर्डसोबत जोडण्यात आला.
अभ्यासकांनी रिसर्च दरम्यान असं आढळलं की, 25 हजार 713 लोकांमधून 44 टक्के पुरूषांना स्ट्रोक आणि हार्ट फेलिअरसहीत कार्डियोवस्कुलर समस्या आढळल्या. तेच महिलांमध्ये या आजारांचा धोका 31 टक्के इतका आढळला.
या रिसर्चनुसार, डायबिटीसने पीडित 25 टक्के पुरूषांमध्ये पायांसंबंधी समस्या आढळून आल्या तेच महिलांमध्ये हे प्रमाण 18 टक्के आहे. तसेच डायबिटीस असलेल्या 35 टकके पुरूष किडनीच्या आजारांनी ग्रस्त आढळून आले. तेच महिलांमध्ये हे प्रमाण 25 टक्के आढळलं.
अभ्यासकांनुसार, डायबिटीसने पीडित महिलांच्या तुलनेत डायबिटीसने पीडित पुरूषांमध्ये हृदयासंबंधी समस्या होण्याचा धोका 51 टक्के आढळला. तर डायबिटीसने पीडित पुरूषांना किडनीसंबंधी समस्या वाढण्याचा धोका 55 टक्के आढळला.