कोरोनातून बऱ्या झालेल्या पुरुषांच्या शरीरात महिलांपेक्षा जास्त असतो 'हा' घटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:42 PM2020-06-23T15:42:16+5:302020-06-23T15:43:56+5:30
कोरोनापासून बचाव होण्यासाठी शरीरातील इम्यून सिस्टीम एंटीबॉडीज तयार करतात.
कोरोनाच्या माहामारीचा प्रसार दिवसेंदिवस जगभरासह भारतातही वाढत आहे. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी केला जात आहे. वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी सातत्याने परिक्षण करत आहेत. कोविड 19 या आजारातून बाहेर आलेल्या पुरूषांमध्ये महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात एंटीबॉडीज असतात. ब्रिटनची प्रमुख आरोग्य संस्था नेशनल हेल्थ सर्विस (NHS) यांतून ही माहिती समोर आली आहे. यानुसार पुरूष उत्तम प्लाज्मा डोनर म्हणजे प्लाज्मा इतरांना दान करण्यासाठी योग्य ठरू शकतात.
कोरोनाच्या अनेक रुग्णांसाठी प्लाज्मा थेरेपी ही परिणामकारक ठरली आहे. अनेक रुग्णालयात कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णाच्या शरीरातील एंटीबॉडीज काढून त्यांचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे. कोरोनाची लागण झालेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी प्लाज्मा थेरेपी परिणामकारक ठरली आहे. म्हणूनच डॉक्टर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील एंटीबाॉडीज आजारी व्यक्तीच्या उपचारांसाठी वापरतात.
एका अध्ययनातून दिसून आले की, ४३ टक्के डोनर पुरूषांच्या शरीरात योग्यप्रमाणात एंटीबॉडीज तयार झाल्या होत्या. तर २९ टक्के महिलांमध्ये एंटीबॉडीज तयार झालेल्या होत्या. एनएचएसने ५९२ प्लाज्मा डोनरवर आधारीत हे परिक्षण केले होते. ब्रिटेनमध्ये आता कोरोनातून बाहेर आलेल्या पुरूषांना प्लाज्मा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जात आहे.
ब्रिटेनमध्ये प्लाज्मा थेरेपीच्या परिक्षणासाठी रुग्णालयात भरती असलेल्या ३ हजार ५०० रुग्णांचे प्लाज्मा थेरेपीने उपचार केले जाणार आहेत. १९१८ मध्ये पहिल्यांदा स्पॅनिश फ्लू या आजाराच्या उपचारांसाठी प्लाज्मा थेरेपीचा वापर करण्यात आला होता. सार्स या आजाराच्या माहामारीदरम्यान रुग्णांचे उपचार प्लाज्मा थेरेपीने केले जात होते.
कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर व्यक्तीची इम्यून सिस्टीम एंटीबॉडीज तयार करते. एंटीबॉडीज शरीराला व्हायरसशी लढण्याचे संकेत देत असतात. दरम्यान कोरोनापासून बचाव होण्यासाठी शरीरातील इम्यून सिस्टीम एंटीबॉडीज तयार करतात. दरम्यान कोरोनातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या शरीरात एंटीबॉडी किती काळापर्यंत जीवंत राहू शकतात. याबाबात संशोधन समोर आलेले नाही.
Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!
....तर जग कोरोना व्हायरसला कधीच हरवू शकणार नाही; WHO ची धोक्याची सुचना