Health :उन्हाळ्यात रात्री तापमान वाढल्याने पुरूषांच्या जीवाला होऊ शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:25 PM2022-04-01T13:25:27+5:302022-04-01T13:26:20+5:30

Health : बीएमजे ओपन मॅगझिनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, हा धोका केवळ ६० ते ६५ वर्ष वयोगटातील पुरूषांनाच प्रभावित करतो.

Men more likely to die as temperatures rise at night claims study | Health :उन्हाळ्यात रात्री तापमान वाढल्याने पुरूषांच्या जीवाला होऊ शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा

Health :उन्हाळ्यात रात्री तापमान वाढल्याने पुरूषांच्या जीवाला होऊ शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा

Next

Health : उन्हाळा सुरू झाला की, आरोग्य खूप जास्त जपावं लागतं. तसं केलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ लागतात. अशात पुरूषांबाबत एक काळजी वाढवणारा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, उन्हाळ्यात (Summer) रात्री तापमान वाढल्याने पुरूष हार्ट अटॅक (Heart Attack) किंवा स्ट्रोकने जीन गमावण्याचा धोका अधिक असतो. सामान्य उष्णतेच्या वर केवळ एक डिग्री सेल्सिअस वाढलं तरी हा धोका जवळपास चार टक्क्यांनी वाढू शकतो.

बीएमजे ओपन मॅगझिनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, हा धोका केवळ ६० ते ६५ वर्ष वयोगटातील पुरूषांनाच प्रभावित करतो. महिलांवर याचा काहीही प्रभाव पडत नाही. ब्रिटनमध्ये गेल्या १५ वर्षात हृदयरोगाशी संबंधित ४० हजार मृत्यूंवर करण्यात आलेल्या रिसर्चमधून हा निष्कर्ष समोर आला.

वैज्ञानिक म्हणाले की, 'जलवायु परिवर्तनामुळे उन्हाळ्यातील रात्रीही जास्त तापत आहेत. अशात या रिसर्चचा निष्कर्ष चिंता वाढवणारा आहे. काळानुसार या कारणाने मृत्यूंची संख्या वाढू शकते. उष्ण वातावरण हे हृदयासाठी धोकादायक मानलं जातं. खासकरून आधीच हृदयासंबंधी आजाराचे शिकार असलेल्या लोकांना याचा जास्त धोका असतो.

ब्रिटिश वैज्ञानिकांनी हृदयरोगाने पीडित लोकांसाठी उष्ण वातावरणात होणारा धोका सांगणाऱ्या या रिसर्चचं स्वागत केलं आहे. तज्ज्ञ म्हणाले की, 'गेल्या १० वर्षात उन्हाळ्यातील रात्रींचं तापमान वाढणं रेकॉर्ड करण्यात आलं. अशात या रिसर्चच्या माध्यमातून भविष्यात यापासून बचाव करण्याचे उपाय शोधले जातील'.

कोणावर जास्त प्रभाव

६५ पेक्षा जास्त वय असलेल्या पुरूषांना हा धोका आढळला नाही. वैज्ञानिक सध्या या मागचं कारण समजू शकलेले नाहीत. तेच ६० ते ६५ वयातील महिलांमध्ये सुद्धा ही समस्या आढळून आलेली नाही. अशात वैज्ञानिक महिलांवर याचा धोका याबाबत वेगळा रिसर्च करण्याचा विचार करत आहेत.

वैज्ञानिक म्हणाले की, 'रात्री झोपताना एअर कंडीशनचा वापर, रूम उष्ण होण्यापासून वाचवण्यासाठी पडद्यांचा वापर आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने हा धोका टाळता येऊ शकतो'.
 

Web Title: Men more likely to die as temperatures rise at night claims study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.