पुरूषांनी 'या' ३ तेलांनी करावी केसांची मालिश, केस तुटणे आणि गळणे होईल बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:27 PM2024-08-26T15:27:22+5:302024-08-26T15:28:15+5:30
Hair oiling : आज आम्ही तुम्हाला केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी पुरूषांनी कोणत्या तेलांचा वापर करावा हे सांगणार आहोत.
Hair oiling : तेलाने केसांची मालिश करणं ही एक जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे. तेलाने मालिश केल्याने केस मजबूत, चमकदार आणि काळे राहतात. पण आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच केसगळतीची समस्या होऊ लागली आहे. कमी वयातच लोकांचं टक्कल पडत आहे. अशात अनेकांना हे माहीत नसतं की, केसगळती थांबवण्यासाठी किंवा केस मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी पुरूषांनी कोणत्या तेलांचा वापर करावा हे सांगणार आहोत.
पुरूषांसाठी खास तेल
बदाम तेल
बदामाचं तेल खोबऱ्याच्या तेलापेक्षा हलकं आणि थोडं घट्ट असतं. पित्त प्रकारच्या लोकांसाठी हे फार चांगलं मानलं जातं. यातील व्हिटॅमिन बी, के आणि ई ने ऑक्सिडेटिव तणाव दूर करण्यास मदत मिळते. जे पुरूषांमध्ये केसगळती होण्याचं एक मुख्य कारण आहे.
भृंगराज तेल
भृंगराज तेलाने केसांची मालिश केल्याने आराम मिळतो तसंच थोडंही थंड होतं. तसेच याने पित्त दोषही संतुलित होतो. वेगवेगळ्या जडीबुटींपासून तयार करण्यात आलेल्या या तेलाने डोक्याच्या त्वचेला फार पोषण मिळतं आणि रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेला भरपूर ऑक्सीजन मिळतं आणि केसांची वाढही होते.
आवळा तेल
आवळ्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर असतं. या तेलाने रक्तप्रवाह सुरळीत होण्यात मदत मिळते आणि केस मूळापासून मजबूत होतात. या तेलामध्ये फॅटी-अॅसिडही असतं ज्याने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं.