50 वयानंतर होत असतील 'या' समस्या तर वेळीच व्हा सावध, लक्षण दिसताच करा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 09:37 AM2024-03-22T09:37:20+5:302024-03-22T09:38:44+5:30
आजकाल बदलल्या लाइफस्टाईलमुळे शरीर लवकर कमजोर होऊ लागतं. 50 वयानंतर पुरूषांचा प्रोस्टेड ग्लॅंड वाढू लागतो.
Enlarged Prostate Symptoms: वय वाढण्यासोबतच पुरूषांमध्ये वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. यातील एक मोठी समस्या म्हणजे प्रोस्टेटची साइज म्हणजे अंडकोष वाढू लागते. याने ब्लॅडर कमजोर होतं. या गंभीर समस्येपासून बचाव करण्यासाठी पुरूषांनी आहारात काही गोष्टींचा समावेश करायला हवा. यांच्या सेवनाने एनलार्ज्ड प्रोस्टेटपासून बचाव होतो आणि ब्लॅडरही फीट राहतं.
आजकाल बदलल्या लाइफस्टाईलमुळे शरीर लवकर कमजोर होऊ लागतं. 50 वयानंतर पुरूषांचा प्रोस्टेड ग्लॅंड वाढू लागतो. या आजाराला मेडिकल भाषेत एनलॉर्ज्ड प्रोस्टेट किंवा बिनाइन प्रोस्टेटिक हाइपरप्लेसिया म्हटलं जातं. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डायबिटीस अॅन्ड डायजेस्टिव अॅन्ड किडनी डिजीजनुसार, 50 वयानंतर 50 टक्के लोकांना ही समस्या होते. तेच 80 वयानंतर 90 टक्के पुरूषांचे प्रोस्टेट वाढलेले असतात.
ब्लॅडर होतं कमजोर
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार, बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया वाढल्याने लघवीची नलिका दबू लागतो. यामुळे ब्लॅडरवर प्रेशर पडतो. ज्यामुळे ते कमजोर होतं.
प्रोस्टेट वाढल्याची लक्षणं
लघवी लीक होणे, लघवी करू न शकणे, ब्लॅडर रिकामं न होणे, रात्री दोनपेक्षा जास्त वेळ लघवीला जावं लागणे, लघवी करताना वेदना आणि ब्लीडिंग, लघवी बाहेर येण्यास उशीर, लघवीसाठी जोर लावावा लागणे, लघवीचा स्पीड कमी होणे, अचानक प्रेशर वाढणे ही प्रोस्टेट वाढल्याची लक्षणं सांगता येतील.
काय कराल उपाय?
तीळ
इंडियन जर्नल ऑफ यूरोलॉजीवर असलेल्या एका शोधानुसार, प्रोस्टेट ग्लॅड हेल्दी ठेवण्यासाठी झिंकची गरज असते. तीळ खाल्ल्याने भरपूर झिंक मिळतं. झिंकमुळे प्रोस्टेट वाढण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.
शिमला मिरची
शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि आजारांचा धोका कमी होतो.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. कारण यांमध्ये फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. या भाज्या खाऊन बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासियाचा धोका कमी केला जाऊ शकतो.
टोमॅटो
प्रोस्टेट हेल्दी ठेवण्यासाठी टोमॅटोमध्ये आढळणारं लायकोपीन मदत करतं. याने प्रोस्टेट कॅन्सरचाही धोका कमी होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर असतं, ज्यामुळे त्याचा रंग लाल असतो.
एवोकाडो
एवोकाडोमध्ये हेल्दी फॅट आणि बीटा सिटोस्टेरोल मिळतं. हे खाल्ल्याने एनलार्ज्ड प्रोस्टेटची लक्षणं कमी होतात. हे तत्व भोपळ्याच्या बीया, सोयाबीन आणि पीकन नट्समध्ये आढळतात.