पुरुषांनी वाढत्या वयात वेळीच घ्यावी काळजी, नाहीतर सामोरे जाल गंभीर आजारांना!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 08:24 PM2021-06-13T20:24:21+5:302021-06-13T20:25:02+5:30

पुरुषांनाही वाढत्या वयाप्रमाणे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा अनेक समस्या आहेत ज्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या समस्यांकडे पुरुषांनी वेळीच लक्ष देणे गरजेच आहे. 

Men should take care in time as they grow older, otherwise they will face serious illnesses! | पुरुषांनी वाढत्या वयात वेळीच घ्यावी काळजी, नाहीतर सामोरे जाल गंभीर आजारांना!

पुरुषांनी वाढत्या वयात वेळीच घ्यावी काळजी, नाहीतर सामोरे जाल गंभीर आजारांना!

Next

वाढत्या वयाप्रमाणे केवळ स्त्रियांनाच समस्या निर्माण होतात असं नाही. पुरुषांनाही वाढत्या वयाप्रमाणे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा अनेक समस्या आहेत ज्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या समस्यांकडे पुरुषांनी वेळीच लक्ष देणे गरजेच आहे. 

लघवी लीक होणं
वाढत्या वयानुसार स्त्रिया अथवा पुरुष दोघांनाही आजारांचा या सामना करावा लागू शकतो. यालाच ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडर (ओएबी) किंवा युरिनरी इनकॉन्टिनन्स (यूआय) असेही म्हणतात. वाढत्या वयातील अनेक पुरूषांमध्ये ही समस्या आढळून येते. प्रोस्टेट या ग्रंथीचा आकार वाढला की ही समस्या उद्भवू शकते. यामुळे मूत्रमार्गातून वाहणाऱ्या लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. मूत्राशयाच्या स्नायूंना दुखापत झाल्यानेही हा आजार उद्भवू शकतो. जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय उपचार याद्वारे हा आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

लघवीतून रक्त येणं
याकडे पुरुषांनी विशेष लक्ष देणं गरजेच आहे. लघवीतून येणारं रक्त येणं हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकते. त्यामुळे यावर त्वरित उपचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी लघवीच्या चाचण्या, एक्स-रे सीटी स्कॅन किंवा सिस्टोस्कोपी या पद्धतींचा वापर करण्यात येतो. लघवीद्वारे रक्त पडण्याची समस्या बंद-सुरू होत असेल तरीही या समस्येवर उपचार घेणं आवश्यक आहे.

लघवी करताना त्रास होणं
बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होणं ही समस्या अनेकदा आढळून येते. यामध्ये व्यक्तीला लघवी करताना  वेदना होतात. वयस्कर पुरूषांमध्ये यामागचे सामान्य कारण असतं. वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढला की ही तक्रार उद्भवते.
टेस्टिकल - लिंगाच्या खालच्या भागात वेदना किंवा गाठी होणं
दोनापेक्षा अधिक आठवडे जर लिगांच्या खालील भागात वेदना जाणवत असेल किंवा त्या ठिकाणी गाठ घट्टपणा वाटत असेल तर त्वरित युरॉलॉजिस्टचा सल्ला घेण योग्य. हे टेस्टिक्युलरच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणं गरजेचं आहे.

Web Title: Men should take care in time as they grow older, otherwise they will face serious illnesses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.