महिलांप्रमाणे पुरुषांनाही सामोरे जावे लागते मेनोपॉजच्या समस्येला, जाणून घ्या याची लक्षणे, कारणे अन् उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:47 PM2021-08-04T16:47:15+5:302021-08-04T16:47:47+5:30
स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही मेनोपॉज येतो. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मेनोपॉजची लक्षणं कमी दिसून येतात...
स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही मेनोपॉज येतो. पुरुषांमधील मेनोपॉजला वैद्यकीय भाषेत ‘अँड्रोपॉझ’ असं म्हणतात. पुरुषांमध्ये ५० शी नंतर काही शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदल किंवा लक्षणे दिसून येतात. या सर्व लक्षणावरून समजते की हा अँड्रोपॉझ (andropause किंवा male menopause) चा काळ आहे. वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरोन testosterone ची पातळी कमी होते. स्त्रियांमध्ये मेनोपॉजमध्ये जशी एस्ट्रोजन हार्मोन्सची कमतरता दिसून येते तशीच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन (testosterone) च्या कमतरता आढळते. सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजीव कुमार यांनी ओन्ली माय हेल्थला पुरुषांमधील मेनोपॉजची लक्षणे सांगितली आहेत. तसेच ते असेही म्हणतात की, पुरुषांमध्ये मेनोपॉजची लक्षणं कमी दिसून येतात.
पुरुषांमधील मेनोपॉजची लक्षणे काय?
नैराश्य, सेक्सची इच्छा न होणे, मूड स्विंग्स, थकवा, झोप न येणे, चिडचिड करणे, निरुत्साही वाटणे, मसल्स कमी होणे, एकाग्रता कमी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.
हे का होतं?
डॉ. संजीव कुमार यांच्यामते पुरुषांमध्ये ३० वर्षानंतर टेस्टोस्टेरोन हार्मोन्स कमी होतात. ८० वर्ष वयापर्यंत ही समस्या कमी होते किंवा वाढते. याशिवाय जुन्या आरोग्यविषयी समस्या, जाडेपणा तसेच काही औषंधांमुळेही टेस्टोस्टेरोनचे उत्पादन घटते.
पुरुषांच्या मेनपॉजवर उपचार
काहीतरी चुकीचं, वेगळं जाणवू लागलं की आपल्या विश्वासु व्यक्तीसोबत सगळं शेअर करा. या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा शेअर केल्यास बरं वाटतं. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास स्थिती सुधारण्यास आणि लक्षणे आटोक्यात येण्यास मदत होते. त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्यात पुढे जाण्याची मानसिकता विकसित होण्यास मदत होईल. यावर अनेक उपाय आहेत आणि लक्षणांच्या गंभीरतेनुसार ते केले जातात. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ऑलोपेथिक औषधे, समुपदेशन, वागण्यातील बदल असे अनेक उपाय आहेत.