Menstrual hygiene day : उन्हाळ्यात मासिक पाळी दरम्यान 'या' गोष्टींची काळजी घेणं गरजेचं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:58 PM2019-05-28T12:58:29+5:302019-05-28T12:59:02+5:30

महिलांना येणारी मासिक पाळी हा कोणताही आजार नसून एक नैसर्गिक चक्र आहे. प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी महिलांच्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करते.

Menstrual hygiene day adopt these tips in summer | Menstrual hygiene day : उन्हाळ्यात मासिक पाळी दरम्यान 'या' गोष्टींची काळजी घेणं गरजेचं!

Menstrual hygiene day : उन्हाळ्यात मासिक पाळी दरम्यान 'या' गोष्टींची काळजी घेणं गरजेचं!

googlenewsNext

महिलांना येणारी मासिक पाळी हा कोणताही आजार नसून एक नैसर्गिक चक्र आहे. प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी महिलांच्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करते. मासिक पाळीच्या दरम्यान, महिलेच्या गर्भाशयातून रक्त आणि इतर गोष्टी वजायना मार्फत बाहेर टाकण्यात येतात. दर महिन्याला 3 ते 5 दिवसांपर्यंत सुरू राहणारी ही प्रक्रिया प्यूबर्टी (10 ते 15 वर्ष) पासून सुरू होऊन रजोनिवृत्ती ( 40 ते 50 वर्ष) पर्यंत सुरू राहते. याबाबत अनेक NGO आणि समाजसेवी संस्था जनजागृती करत असून अजूनही काही गावांमध्ये मासिक पाळीला अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. 

मेंस्ट्रुअल हायजीन डे दरवर्षी 28 मे रोजी साजरा करण्यात येतो. मासिक पाळी आणि त्या दिवसांमध्ये आवश्यक असणाऱ्या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. कारण अनेक महिला या दिवसांमध्ये स्वच्छता न राखल्यामुळे अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. 

उन्हाळ्यामध्ये मेंस्ट्रुअल हायजीन 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य आणि त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. तसं पाहायला गेलं तर वर्षाच्या प्रत्येक महिन्यामध्ये मेस्ट्रु्अल हायजीनबाबत जागरूक असणं गरजेचं असतं. परंतु तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यामध्ये याबाबत आणखी काळजी घेणं आवश्यक असतं. 

मेंस्ट्रुअल हायजीन आणि सॅनिटरी पॅड्स 

उन्हाळ्यामध्ये पीरियड्स दरम्यान मेंस्ट्रुअल हायजीन ठिक ठेवण्यासाठी कपड्याऐवजी सॅनिटरी पॅडचा वापर करा. पीरियड्समध्ये सॅनिटरी पॅडचा वापर करण्यासोबतच दर 4 तासांनी पॅड चेंज करायला विसरू नका. उन्हाळ्यामध्ये मासिक पाळीदरम्यना शरीराची विशेष साफ सफाईवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

मेंस्ट्रुअल कपचा वापर

बदलत्या काळानुसार, सॅनिटरी पॅडमध्येही अनेक बदल घडून येत आहेत. त्यामुळे सॅनिटरी पॅड्सची निवड करताना ते तुमच्यासाठी योग्य असण्यासोबतच पर्यावरणासाठीही ठिक असतील याची काळजी घ्या. जर तुम्ही मेंस्ट्रुअल कपचा वापर करू शकत असाल तर सॅनिटरी पॅडऐवजी याचाच वापर करा. मेंस्ट्रुअल कपमध्ये हायजीनवर लक्ष देणं फार सोप असतं. 

अशी चूक करू नका 

मासिक पाळीमध्ये अनेक महिला दोन सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. असं अजिबात करू नका. जास्त रक्तस्त्राव होत असेल तर काही वेळाच्या अंतराने पॅड चेंज करा. त्यासाठी दोन पॅढ एकाच वेळी वापरू नका. असं केल्याने वजायनाच्या आजूबाजूच्या भागात इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. 

अशी ठेवा स्वच्छता...

मासिक पाळीमध्ये वजायनाच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ ठेवा. मेंस्ट्रुअल हायजीनसाठी आवश्यक आहे की, मासिक पाळी दरम्यान वजायनाच्या आजूबाजूच्या भागात स्वच्छता राखणं गरजेचं असतं. स्वच्छता करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकता. स्वच्छतेसाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या वजायना क्लिनरचा उपयोग करू शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

Web Title: Menstrual hygiene day adopt these tips in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.