फक्त महिलांनाच नाही तर पुरूषांनाही होतात मूड स्विंग; 'ही' आहेत कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 04:02 PM2019-07-09T16:02:57+5:302019-07-09T16:12:30+5:30
अनेकदा फक्त महिलांनाच मूड स्विंग येत असतात, असं समजलं जातं. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, फक्त महिलांनाच नाही तर पुरूषांनाही मूड स्विंग येतात. खरं तर मूड स्विग येण्याची अनेक कारणं असतात.
(Image Credit : Bel Marra Health)
अनेकदा फक्त महिलांनाच मूड स्विंग येत असतात, असं समजलं जातं. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, फक्त महिलांनाच नाही तर पुरूषांनाही मूड स्विंग येतात. खरं तर मूड स्विग येण्याची अनेक कारणं असतात. एका संशोधनातून समोर आलेल्या आकड्यांनुसार, मूड स्विंगचे शिकार होण्याऱ्या व्यक्तींमध्ये महिलांपेक्षा पुरूषांची संख्या वाढत आहे. यामागे अनेक मानसिक आणि भावनिक कारणांसोबतच इतरही अनेक कारणं असू शकतात. जाणून घेऊया पुरूषांना मूड स्विंग होणाची कारणं...
काय आहे मूड स्विंग?
मूड स्विंग म्हणजे, मानसिक आणि भावनात्मक असंतुलनाची अशी स्थिती ज्यामध्ये आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवणं अशक्य होतं. यामध्ये व्यक्ती अनेकदा फार खूश होते, तर कधी अचानक रडू लागते. अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला स्वतःलाच समजत नाही की, त्याला कोणत्या गोष्टीचा राग येईल आणि कोणती गोष्ट केल्याने आनंद होईल. खरं तर मानसिक तणावामुळे अशा परिस्थितीचा सामना व्यक्तीला करावा लागतो.
पुरूषांमध्ये वाढतेय समस्या
आतापर्यंत असं समजलं जात होतं की, मूड स्विंगची समस्या फक्त महिलांमध्येच दिसून येते. कारण त्या आपल्या भावना सहज व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांना तणावाचा सामना करावा लागतो आणि परिणामी मूड स्विंगची समस्या उद्भवते. पण मागील काही वर्षांपासून पुरूषांमध्ये मूड स्विंगची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. यामागेही मानसिक दबावाला कारणीभूत ठरवलं जातं.
पुरूषांमध्ये दिसून येणारी मूड स्विंगची कारणं :
हार्मोन्सचे असंतुलन
हार्मोन्सच्या असंतुलनाची समस्या फक्त महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्येही पाहायला मिळतात. पुरूषांमध्ये प्रत्येक 3 ते 4 महिन्यांमध्ये हार्मोन इम्बॅलन्सची समस्या होते. ज्यामुळे त्यांचा मूड सतत बदलत राहतो. कधी-कधी पुरूष महिलांप्रमाणे ओव्हर इमोशनल होतात. एवढचं नाही तर एका मिनिटामध्ये ते दुःखी होतात, तर काही क्षणातच ते खूश होतात.
अपेक्षांचं ओझं
पुरूषांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. अनेकदा या सर्व जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचं ओझं होतं. ते सर्व गोष्टी सांभाळू शकत नाहीत. जर पुरूषांमध्ये हार्मोन इम्बॅलन्सची समस्या नसेल तर मूड स्विंगचं दुसरं सर्वात महत्त्वाचं कारणं म्हणजे, त्यांच्या मनावर आघात होणं, हेच असतं.
ताण
अनेक पुरूष तणाव व्यवस्थित हॅन्डल करू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांचा मूड खराब होतो. परिणामी त्यांना मूड स्विंगचा सामना करावा लागतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.