मानसिक तणावामुळेही येऊ शकतो ताप, अनेक आजारांचं ठरू शकतं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 10:29 AM2020-04-04T10:29:44+5:302020-04-04T10:36:34+5:30
ताप का येतो याची वेगवेगळी कारणे असू शकतात. असंच एक कारण एका रिसर्चमधून समोर आलं आहे.
मानसिक तणावामुळे व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्या आला आहे की, जी व्यक्ती एखाद्या मानसिक तणावाने ग्रस्त असते, त्यांचं शारीरिक तापमान वाढतं. ज्यामुळे त्यांना नेहमी ताप येऊ शकतो.
अभ्यासकांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही श्रोत्यांसमोर बोलण्यासाठी स्टेजवर जात असता आणि तुम्ही वाट बघता असता तेव्हा तुमचं हृदय अधिक वेगाने धडधडू लागतं. श्वास भरून येतो, ब्लड प्रेशर वाढतं आणि हाताला घाम येऊ लागतो. या गोष्टींमुळेही तुमच्या शरीराचं तापमान वाढतं आणि तुम्हाला ताप येऊ लागतो.
अभ्यासकांनी सांगितले की, अनेकदा भावनात्मक तणाव सुद्धा अनेक प्रकारचा ताप येण्याचं कारण ठरतो. ते म्हणाले की, जर एखाद्याचं शरीर गरम असेल तर गरजेचं नाही की, त्याला ताप असेलच. हे हीट स्ट्रोक किंवा हायपर थर्मिया सुद्धा असू शकतं. हायपर थर्मियाला साधारण ताप समजणं फार मोठी चूक सिद्ध होऊ शकते.
तापमान वाढण्यासोबतच शरीराचं तापमानही वाढू लागतं, ज्यामुळे मेंदूची एक ग्रंथी हायपो थॅलेमस शरीराची हीट रेग्युलेटरी सिस्टीमसारखं काम करतं. याने शरीराचं तापमान संतुलित ठेवण्याचं काम केलं जातं. फार जास्त उष्णतेमुळे अनेकदा या ग्रंथी कमजोर होतात आणि आपलं काम बंद करतात.
अशात शरीराच्या तापमानाचं संतुलन बिघडतं. जेव्हा शरीरातून अनावश्यक उष्णता बाहेर येऊ शकत नाही तेव्हा शरीर अधिक गरम होऊ लागतं. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर असंच होतं. हे फार चिंताजनक आणि जीवघेणं आहे. तंत्रिका तंत्र या प्रक्रियेला हायपर थर्मिया म्हणतात.
2004 मध्ये उंदरांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले की, जेव्हा उंदराच्या मेंदूचं तापमान वाढवण्यासाठी प्रक्रिया केली जाते तेव्हा त्यांच्या मेंदूत अनेक प्रकारचे बदल बघायला मिळतात. अभ्यासकांनी सांगितले की, ब्राउस चरबी गरज असेल तेव्हा शरीराचं तापमान वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.