उलट्या होतात, प्रकाशामुळे डोकं ठणकतं? मग ही असू शकतात मायग्रेनची लक्षणं; वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 03:25 PM2024-06-22T15:25:36+5:302024-06-22T15:28:24+5:30
अनेकदा डोकेदुखीचे प्रमाण वाढून त्याचे नंतर मायग्रेनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते.
Health Tips : अनेकदा डोकेदुखीचे प्रमाण वाढून त्याचे नंतर मायग्रेनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते. औषधोपचार वेळेत घेतल्यास मायग्रेन हा नियंत्रणात ठेवता येण्यासारखा आजार आहे.
बऱ्याचदा आपण एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये इतके अडकतो की आपण नीट विचार करू शकत नाही. एखाद्या गोष्टीचा ताण येतो किंवा वेळेवर जेवत नाही. या गोष्टींमुळे डोकेदुखी होते. ही डोकेदुखी मायग्रेनचे रूप घेऊ शकते.
काय आहे मायग्रेन?
मायग्रेन ही एक प्रकारची डोकेदुखी आहे ज्यामध्ये उलट्या होणे, अस्वस्थता, प्रकाश आणि मोठ्या आवाजाची संवेदनशीलता यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहनशक्तीच्या पलिकडे जाते. आपल्याला माहीत आहे की आपले डोके संपूर्ण शरीराशी जोडलेले आहे? डोके निरोगी असेल, तरच आपले शरीरही निरोगी राहते. मेंदूद्वारेच आपण विचार करतो, शिकतो आणि गोष्टी लक्षात ठेवतो.
हा एक प्रकारचा मेंदू विकार असून जो ३५ ते ४० वयोगटातील लोकांमध्ये वेगाने विकसित होतो. डब्ल्यूएचओच्या मते, हा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो जो मुख्यतः हार्मोनल प्रभावामुळे होतो.
हा उपाय ठरेल फायद्याचा-
१) आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आपले मन आपल्याला सांगते. मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी हेडमसाज उपयुक्त ठरतो.
२) या त्रासाचे प्रमाण जास्त असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही फायदेशीर ठरते. एकदा ही डोकेदुखी सुरू झाली की काम, खाणे-पिणे, दैनंदिन व्यवहार असे काहीही सुचेनासे होते. त्यामुळे हा त्रास उद्भवूच नये यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली.
ही घ्या काळजी :
१) जेव्हा रक्तप्रवाह मेंदूपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही, तेव्हा ब्रेन स्ट्रोकचा धोकाही निर्माण होतो.
२) मसाजमुळे तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल कमी होते आणि सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी 'फील गुड' हार्मोन्स वाढते. यामुळे आपल्याला तणावापासून आराम मिळतो. हेडमसाज केल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते.
३) जेव्हा प्रेशर पॉइंट्स दाबले जातात, तेव्हा त्या ठिकाणी रक्तप्रवाह वाढतो. असे केल्याने केसांची वाढ चांगली होते.
४) भरपूर पाणी पिणे तसेच वेळेवर जेवण करणे अति मसालेदार पदार्थ खाऊ नये, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.