फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर 'या' गोष्टीचे सेवनही तुमची हाडं बनवतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:13 PM2021-12-23T17:13:55+5:302021-12-23T17:15:02+5:30

तज्ज्ञांच्या मते, वयाच्या ३० नंतर हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांसह भाज्यांचे सेवन भरपूर प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

with milk and milk products vegetables are necessary for good bone health | फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर 'या' गोष्टीचे सेवनही तुमची हाडं बनवतील मजबूत

फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर 'या' गोष्टीचे सेवनही तुमची हाडं बनवतील मजबूत

Next

हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली जाते, परंतु केवळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर भाज्या देखील हाडे मजबूत ठेवतात. तज्ज्ञांच्या मते, वयाच्या ३० नंतर हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांसह भाज्यांचे सेवन भरपूर प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत
द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमधील संशोधनानुसार, कॅल्शियमसाठी सर्वोत्तम उत्पादने म्हणजे भाज्या किंवा वनस्पती-आधारित अन्न. या संशोधनात अशा १०२ प्रौढांचा समावेश करण्यात आला, जे कमी प्रमाणात भाज्या खातात. सुमारे आठ आठवडे चाललेल्या या संशोधनात निम्म्या सहभागींना जास्त भाज्या खायला दिल्या गेल्या. त्याच वेळी, अर्ध्या लोकांना सामान्य आहारावर ठेवण्यात आले. संशोधनाअंती तज्ज्ञांना असे आढळून आले की ज्या गटाला जास्त भाज्या दिल्या गेल्या. त्याची हाडे पूर्वीपेक्षा मजबूत झाली.

या गोष्टी खाल्ल्याने फायदा होतो
बोन हेल्थ अँड ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशननुसार, भाज्यांमध्ये असलेले पोषक तत्व हाडे मजबूत करतात. ब्रसेल्स स्प्राउट्स, शिमला मिरची, रताळे आणि टोमॅटो यांसारख्या भाज्या खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय स्ट्रॉबेरी, संत्री आणि केळी ही फळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही खाऊ शकता.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम व्यतिरिक्त, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, आहारातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी हाडांच्या ऊती तयार करते. त्याच्या मदतीने कॅल्शियम शोषण्यास मदत होते. त्याच वेळी, व्हिटॅमिन के हाडांना फ्रॅक्चर आणि ऑस्टियोपोरोसिसच्या जोखमीपासून वाचवते. व्हिटॅमिन सी द्वारे कोलेजन तयार होते, जे त्वचा आणि हाडे निरोगी ठेवते. मॅग्नेशियम हाडांची घनता सुधारण्यास मदत करते.

Web Title: with milk and milk products vegetables are necessary for good bone health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.