दुध ठरु शकते तुमच्या आरोग्यासाठी घातक, पाहा काय आहेत दुष्परिणाम...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 01:00 PM2021-07-18T13:00:40+5:302021-07-18T13:05:01+5:30
दूध हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. दुधामध्ये होणारी भेसळ हे त्याचे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे न भेसळ केलेल दुधही जास्त पिणे आपल्याला महागात पडू शकते. कसे? वाचा पुढे
दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु काहीवेळा हे दूध हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. दुधामध्ये होणारी भेसळ हे त्याचे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे न भेसळ केलेल दुधही जास्त पिणे आपल्याला महागात पडू शकते. कसे? वाचा पुढे
यकृत आणि मुत्रपिंडासाठी धोकादायक
दुध आपल्या यकृत आणि मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, जर भेसळयुक्त दूध किंवा त्याच्या प्रोडक्ट्सचा वापर सलग दोन वर्षे केला गेला तर ते आपल्या इंटेस्टाइन, यकृत आणि मूत्रपिंडाचेच नुकसान करीत नाही तर इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.
पोटाच्या समस्या
आपण आवश्यकतेपेक्षा जास्त दूध पिल्यास, यामुळे आपल्या शरीरात बर्याच समस्या उद्भवू शकतात. दुधाच्या अतिसेवनाने पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते, तसेच गॅसचा देखील त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत दुधाचे सेवन योग्य प्रमाणात करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवनार नाही.
सरकोपेनियाचा धोका
एका अभ्यासानुसार वृद्ध लोकांमध्ये दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे दररोज सेवन केल्याने अशक्तपणा आणि सरकोपेनियाचा धोका कमी होतो.
अस्वस्थता, थकवा आणि आळशीपणाची समस्या
जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कधीकधी मळमळ, अस्वस्थता, थकवा आणि सुस्तपणा येऊ शकतो.
आतड्यांची जळजळ
या प्रोडक्ट्स मध्ये ए १ केसीन असते, ज्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि बॅक्टेरियांना प्रोत्साहन मिळते.