दुधामुळे वजन कमी होतं की वाढतं? पाहा सत्य काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 05:37 PM2021-11-07T17:37:06+5:302021-11-07T17:37:38+5:30

वजन कमी करताना आहारात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्लाही यावेळी दिला जातो. यामुळे प्रश्न पडतो की खरंच दुधामुळे वजन वाढू शकते का ?

milk is helpful for weight loss or not, know the benefits of milk for weight loss | दुधामुळे वजन कमी होतं की वाढतं? पाहा सत्य काय...

दुधामुळे वजन कमी होतं की वाढतं? पाहा सत्य काय...

googlenewsNext

वजन कमी करण्याबाबत सजग असलेल्या लोकांना कोणते खाद्यपदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत याबाबत अनेक शंका असतात. अशावेळी बऱ्याच जणांना दूध प्यावे की पिऊ नये असाही प्रश्न पडतो. आहारात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्लाही यावेळी दिला जातो. यामुळे प्रश्न पडतो की खरंच दुधामुळे वजन वाढू शकते का ?

दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्त्वे असतात. आरोग्यासाठी महत्त्वाचे आणि अनेक पोषक घटकांनी दूध परिपूर्ण असले तरीही त्यामध्ये काही प्रमाणात फॅटही असते. यामुळे वजन वाढू शकते.असे असले तरीही शरीराला दररोज कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डीची आवश्यकता असते. याकरिता डाएटमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वजन कमी करण्यासाठी पोषक ठरतात.

दुधात वजन वाढण्याशी संबंधित मॅक्रोन्यूट्रिएंट गुणधर्मही असतात तसेच सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. या दोनही घटक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. 250 मिली संपूर्ण दुधात (1 कप) जवळजवळ 5 ग्रॅम चरबी आणि 152 कॅलरीज असतात.

एका अभ्यासानुसार , ज्या लोकांनी सहा महिने दररोज दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले त्यांचे वजन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केलेल्यांच्या तुलनेत 5.4 किलोग्रॅमने कमी झाले. तसेच अभ्यासकांनी असेही सांगितले आहे की, जे लोक आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करतात त्यांचे वजन अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते. त्यांच्या कमरेचा घेरदेखील कमी असतो. दुधातील कॅल्शियममुळे लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाईप 2 मधुमेह, ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोकाही टाळता येऊ शकतो.

दुधामुळे खरंच वजन वाढते का ?
दुधामुळे वजन वाढू शकत नाही. दुधात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. स्नायू आणि हाडांच्या मजबुतीकरिता दुधाची आवश्यकता असते. शिवाय दुधात झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जीनवस्त्त्व बी 12, जीवनसत्त्व डी या पोषक तत्त्वांचा समावेश असल्याने प्रतिकारशक्ती वाढते. चयापचय क्रियाही सुरळीत राहण्यास मदत होते. 250 मिली. दुधात 8 ग्रॅम प्रथिने आणि 125 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. त्यामुळे दररोज शरीरासाठी आवश्यक असले त्या प्रमाणात आपल्या आहारात दुधाचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. सकाळी नाश्त्यावेळी एक ग्लास दूध घेतले तर आपली भूक शमते. कारण दुधात भूक शमवणारेही गुणधर्म असतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना दूध प्यायल्यास पोटही भरलेले राहते. यामुळे कमी खाल्ले गेले तरी डाएटही पाळले जाते.

वजन कमी करणाऱ्यांसाठी…
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला तुमच्या आहारातून दूध आणि दुग्धजन्य उत्पादने कमी करण्याची गरज नाही. दूध हे संतुलित आहाराचा अत्यावश्यक भाग आहे. दररोज एक कप दूध किंवा 250 मिली दूध तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करू शकते. व्यायामानंतर प्रोटीन शेक घेत असाल तर ते दुधात घाला. जर तुम्ही लैक्टोज घेत असाल तरच दूध घेणे टाळावे. अशावेळी सोया आणि नट मिल्क यासारखे दुग्धजन्य पदार्थ घेऊ शकता.

Web Title: milk is helpful for weight loss or not, know the benefits of milk for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.