दूध की ज्यूस...सकाळचं पहिलं ड्रिंक म्हणून काय हेल्दी ठरेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 11:46 AM2020-02-19T11:46:21+5:302020-02-19T11:46:26+5:30
अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, नाश्त्यात दूध प्यावं कि ज्यूस? अनेकांना नाश्त्यात भरपूर कॅल्शिअम असलेलं दूध सेवन करणं पसंत असतं.
ही गोष्ट तर वेगवेगळ्या रिसर्चमधून सिद्ध झाली आहे की, सकाळच्या नाश्त्यामुळे दिवसाची सुरूवात चांगली होते आणि कधीच नाश्ता स्किप करू नये. इतकेच नाही तर तुम्ही नाश्त्यात काय खाता याकडेही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. रात्रीच्या जेवणानंतर आपण झोपतो तेव्हा ८ ते ९ तास पोटात काहीच जात नाही. अशात सकाळी शरीराला पुन्हा एनर्जीसाठी नाश्ता करण्याची गरज असते. त्यामुळे पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा नाश्त्यात समावेश करायला पाहिजे.
नाश्त्यात दूध घ्यावं कि ज्यूस?
(Image Credit : cheatsheet.com)
अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, नाश्त्यात दूध प्यावं की ज्यूस? अनेकांना नाश्त्यात भरपूर कॅल्शिअम असलेलं दूध सेवन करणं पसंत असतं. तर काही लोकांना सकाळी नाश्त्यात ब्रेड-टोस्ट किंवा ऑम्लेटसोबत १ ग्लास संत्र्याचा ज्यूस सेवन करणं आवडतं. पण सकाळचं पहिलं ड्रिंक म्हणून दूध चांगलं कि ज्यूस हे समजून घेण्यासाठी आणखी काही जाणून घेऊ....
दूध पिण्याचे फायदे
(Image Credit : verywellhealth.com)
तुम्हाला हे माहीत असेलच कि दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं. सोबतच प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, हेल्दी फॅट्सही भरपूर प्रमाणात असतं. दुधाचे शरीराला होणाऱ्या अनेक फायद्यांमुळेच पूर्वीपासून लोक दुधाचं सेवन करत आहेत. अशात दिवसाची सुरूवात दमदार करण्यासाठी दुधाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.
काही नुकसानही होतात
(Image Credit : nagalandpost.com)
दुधात सॅच्युरेडेट फॅट असतं ज्याने काहींना लठ्ठपणा आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका होऊ शकतो. सोबत अलिकडे जनावरांना इंजेक्शनही दिलं जातं जेणेकरून त्यांनी जास्त दूध द्यावं. या केमिकलचा देखील आपल्या आरोग्यावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला दुधाच्या क्वालिटीची गॅरंटी नसेल तोपर्यंत दूध सेवन करू नका.
संत्र्याच्या ज्यूसचे फायदे
(Image Credit : mirror.co.uk)
व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्याने याने आपल्या शरीराची इम्यूनिटी वाढून आपण वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहोत. व्हिटॅमिन सी वातावरणाशी संबंधित समस्या जसे की, प्रदूषण, सूर्याची घातक किरणे इत्यादींपासून आपला बचाव करतं. सकाळी नाश्त्यात जर तुम्ही एक ग्लास संत्र्याचा ज्यूस सेवन केला तर तुमची दिवसभराची व्हिटॅमिन सी ची गरज पूर्ण होते.
ज्यूसचे काही नुकसानही आहेत
(Image Credit : huffingtonpost.com.au)
जर तुम्ही घरात स्वत: तयार करत असाल आणि फ्रेश ज्यूस सेवन करत असाल तर फायदा होईल. पण जर तुम्ही पॅकेज्ड ज्यूसचं सेवन कराल तर त्यात शुगर अधिक प्रमाणात असते आणि ज्यूस फ्रेशही नसतो. या ज्यूसची टेस्ट वाढवण्यासाठी त्यात काही केमिकल्सही वापरले जातात. फ्रेश संत्र्याच्या ज्यूसची आणखी समस्या म्हणजे जेव्हा फळातून ज्यूस काढला जातो तेव्हा त्यातील पोषक तत्व निघून जातात.
ज्यूसपेक्षा दूध चांगलं
(Image Credit : lifeberrys.com)
नाश्त्यात दूध कि ज्यूस यात दूध अधिक हेल्दी ठरत असल्याचं समोर येतं. कारण दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं आणि याने आपली हाडे मजबूत होतात, दात मजबूत होतात. तसेच सकाळी एक ग्लास दूध प्यायल्यास पोट भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही. पण केवळ ज्यूस सेवन करून पोट जास्त वेळ भरलेलं राहणार नाही. तसेच दुधात हेल्दी प्रोटीन असतं, ज्यामुळे तुम्ही दिवसभर अनहेल्दी पदार्थ खाण्यापासूनही दूर रहाल. त्यामुळे सकाळी नाश्त्यात संत्र्याच्या ज्यूसऐवजी दुधाचं सेवन करा.