पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतात नुकसान? वाचाल तर फायद्यात रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:41 AM2024-07-12T10:41:45+5:302024-07-12T10:42:22+5:30

Milk Tea Side Effect In Monsoon : एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. त्या काय हे आज जाणून घेऊ.

Milk tea side effects in rainy season, know the precautions | पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतात नुकसान? वाचाल तर फायद्यात रहाल!

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतात नुकसान? वाचाल तर फायद्यात रहाल!

Milk Tea Side Effect In Monsoon : बाजारात चहाचे वेगवेगळे प्रकार आले असतील तरी दुधाचा चहा पिणं ही लोकांची सवय आणि आवड म्हणता येईल. जास्तीत जास्त लोक दुधाचा चहा घेतात. तसा तर चहा कोणत्याही ऋतूमध्ये लोक न विसरता पितात. मात्र, पावसाळा आला की, लोक जास्त चहा पितात. म्हणजे पावसाच्या रिमझिम धारा आणि गरमागरम चहा हे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडतं. पण एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. त्या काय हे आज जाणून घेऊ.

पचनासंबंधी समस्या

या दिवसात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने गॅस, ब्लोटिंग आणि अॅसिडिटीसारख्या समस्या होतात. पावसाळ्यात आधीच पचन तंत्र कमजोर झालेलं असतं. अशात जर तुम्ही जास्त चहा घेतला तर पोटासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. ज्या लोकांना आधीच अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या आहे त्यांना तर दुधाचा चहा अजिबात न पिण्याचा सल्ला दिला जातो.

हाडं कमजोर होतात

दुधाच्या चहामध्ये टॅनिन आणि कॅफीन भरपूर असतं जे शरीरात कॅल्शिअमच्या अवशोषणात अडथळा आणतात. याचा हाडांवर प्रभाव पडतो. जास्त चहा घेतल्याने हाडे कमजोर होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही वाढतो.

झोप खराब होते

चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं जे पचन तंत्र बिघडवतं. जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्याने झोप न येण्याची किंवा झोपेची क्वालिटी बिघडते. खासकरून रात्री चहा प्यायल्याने झोप खराब होते. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवतो.

दात खराब होतात

दुधाच्या चहामध्ये असलेली साखर दातांसाठी नुकसानकारक ठरू शकते. चहा जास्त प्यायल्याने दातांना किट लागते आणि त्यावर पिवळा थर जमा होतो. त्याशिवाय चहामधील टॅनिनमुळे दातांवर पिवळे डाग येतात.

वजन वाढतं

पावसाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते. अशात दूध आणि साखरेचा चहा सेवन केल्याने कॅलरी जास्त मिळतात. त्यामुळे या दिवसात शारीरिक हालचाल कमी होत असल्याने कॅलरी बर्न करणं अवघड होतं. कॅलरी बर्न झाल्या नाही तर वजन वाढतं.

काय घ्याल काळजी

- पावसाळ्यात दुधाच्या चहाचं सेवन कमी करा.

- चहामध्ये साखर कमी टाका आणि जास्त वेळ चहा उकडू नका.

- चहामध्ये आलं, तुळशीची पाने आणि वेलची टाका.

- जर चहा जास्त पित असाल तर पाणीही भरपूर प्या.

Web Title: Milk tea side effects in rainy season, know the precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.