बाजरीच्या भाकरीचे इतके फायदे की तुम्हाला रोज खावीशी वाटेल, वजन कमी करण्यासाठी रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:20 PM2021-11-19T15:20:12+5:302021-11-19T15:20:20+5:30

जाणून घेऊया, बाजरीची भाकरी खाल्ल्यानं वजन कसं कमी करता येतं. यासोबतच वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या इतर कोणत्या पाककृती बनवता येतील हेदेखील माहिती करून घेऊ.

millet bhakari is extremely beneficial for health and helps in weight loss | बाजरीच्या भाकरीचे इतके फायदे की तुम्हाला रोज खावीशी वाटेल, वजन कमी करण्यासाठी रामबाण

बाजरीच्या भाकरीचे इतके फायदे की तुम्हाला रोज खावीशी वाटेल, वजन कमी करण्यासाठी रामबाण

googlenewsNext

स्थूलपणा कमी करण्यासाठी डायटिंग खूप आवश्यक आहे, असं म्हटलं जातं. मात्र, पोट भरून खाल्ल्यानंतरही तुमचं वजन कमी होऊ शकतं. फक्त यासाठी तुम्हाला गव्हाच्या पोळीऐवजी बाजरीची भाकरी खावी लागेल. चला जाणून घेऊया, बाजरीची भाकरी खाल्ल्यानं वजन कसं कमी करता येतं. यासोबतच वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या इतर कोणत्या पाककृती बनवता येतील हेदेखील माहिती करून घेऊ.

वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे फायदे
आहारतज्ज्ञ डॉ.रंजना सिंग यांनी झी न्यूजशी बोलताना स्थूलपणा कमी करण्यासाठी बाजरी या धान्याच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली. त्या म्हणतात, वजन कमी करण्यासाठी डायटिंग आवश्यक नाही. उलट आहारात बदल करूनही पोटावरी चरबी जाळली जाऊ शकते. बाजरीमध्ये फायबर असतं. यामुळं पोट जास्त काळ भरलेलं राहतं. बाजरीची भाकरी पोटभर खाल्ल्यानंतर तुम्हाला इतर कोणतंही खाद्य पोटभरण्यासाठी खावं लागत नाही. तसंच, लगेच पुन्हा जेवावं लागत नाही. यामुळं कोणतंही अस्वास्थ्यकर अन्न खाणं टाळलं जातं. यासोबतच, बाजरीची भाकरी रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, पचनक्रिया बिघडणं यासारख्या स्थूलपणा वाढवणाऱ्या बाबी सुधारण्यास मदत करते.

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीसोबतच इतर काही पाककृतींचीही मदत घेतली जाऊ शकते. त्या कोणत्या आहेत ते पाहू.

बाजरीची खिचडी
खिचडी हा एक अतिशय आरोग्यदायी पदार्थ आहे. याच्यामुळं तुमचं पोट निरोगी राहतं. पण, तांदळाच्या ऐवजी बाजरीचा वापर केल्यानं तुम्ही वजनही कमी करू शकता. मधुमेही रुग्णही हा पदार्थ कोणतीही काळजी न करता खाऊ शकतात.

बाजरीची लापशी
नाश्त्यात बाजरीची लापशी खाणं लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजरीमध्ये केळी मिसळून तुम्ही ती अधिक फायदेशीर बनवू शकता. याच्या मदतीने तुम्हाला दिवसभरासाठी आवश्यक प्रोटीन आणि एनर्जीदेखील मिळेल.

Web Title: millet bhakari is extremely beneficial for health and helps in weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.