पुदिन्याच्या पानांचे आरोग्याला मिळतात वेगवेगळे फायदे, वाचाल तर नियमित कराल सेवन...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:49 PM2024-05-30T16:49:43+5:302024-05-30T16:50:18+5:30
Mint Health Benefits : पुदीन्याचे आरोग्याला खूप फायदे मिळतात. इतके की, तुम्ही सेवन करताना कधी विचारही केला नसेल. आज हेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Mint Health Benefits : पुदिन्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. कधी याचा वापर चहामध्ये किंवा इतर काही ड्रिंक्समध्येही केला जातो. पण अनेकांना पुदिन्याचे शरीराला काय काय फायदे मिळतात हे माहीत नसतं. पुदिन्याचे आरोग्याला खूप फायदे मिळतात. इतके की, तुम्ही खाताना कधी विचारही केला नसेल. आज हेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. दीक्षा भावसार यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत पुदिन्याचे शरीराला काय काय फायदे होतात, कोणत्या समस्या दूर होतात याची माहिती दिली आहे. सामान्य जास्तीत जास्त लोक पुदिन्याचा वापर पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी करतात. पण जेव्हा याचे आरोग्यादायी फायदे वाचाल तर नियमितपणे याचा वापर कराल.
डायजेशन चांगलं होतं
पुदिन्याचं सेवन केलं तर डायजेशन म्हणजेच पचन चांगलं होतं. याने पचनासाठी आवश्यक बाइल रस जास्त तयार होतो. ज्यामुळे लवकर आणि पचन चांगलं होतं.
सर्दी-खोकला
सर्दी आणि खोकला या कधीही होणाऱ्या समस्या आहेत. या समस्या सामान्य असल्या तरी त्रासदायकच असतात. त्यामुळे पुदिन्याचा वापर करून तुम्ही सर्दी खोकला दूर करू शकता. यासाठी तुमच्या चहात पुदिन्याचे काही पाने टाकून सेवन करावं.
घशाची खवखव दूर होईल
अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी घशात खवखव होऊ लागते. यात घसा दुखूही लागतो. पुदीना ही समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. पुदिन्याचा चहा घ्याल तर तुम्हाला लगेच बरं वाटेल.
तोंडाचं आरोग्य
दात, हिरड्या दुखणे, तोंडाचा वास येणे, दात खराब होणे किंवा दात पिवळे होणे अशा समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने फार फायद्याची ठरतात.
वजन कमी होतं
तुम्ही जर तुमचं वाढलेलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही पुदिन्याचं सेवन केलं पाहिजे. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
तुम्हाला जर मूड फ्रेश करायचा असेल, चिडचिडपणा कमी करायचा असेल, डोकेदुखी कमी करायची असेल, सर्दी, कफ दूर करायचा असेल तर याही समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याची मदत होते. यासाठी तुम्हाला फक्त पुदिन्याच्या चहाचं नियमित सेवन करायचं आहे.
कसा बनवाल पुदिन्याचा चहा?
7 ते 10 पुदिन्याची पाने 1 ग्लास पाण्यात 5 मिनिटे उकडून घ्या. यात चवीनुसार थोडी साखर टाका. रोज सकाळी या खास चहाचं सेवन करा. याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत मिळते.