चमत्कार!! देशात प्रथमच रुग्णाला रक्त न चढवता हृदय प्रत्यारोपण, 'या' शहरात यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:33 PM2023-10-19T19:33:17+5:302023-10-19T19:34:08+5:30
ही आशियातील 'अशी' पहिलीच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली
Blood less heart transplant: भारतात प्रथमच एका रुग्णाचे हृदय प्रत्यारोपण अशा प्रकारे करण्यात आले की त्याला रक्ताच्या एका युनिटचीही गरज भासली नाही. सहसा, शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला रक्त दिले जाते कारण शस्त्रक्रियेदरम्यान बराच रक्तस्त्राव होतो. पण नवीन तंत्र वापरून आणि शस्त्रक्रियेची पद्धत बदलून डॉक्टरांनी हा चमत्कार करून दाखवला आहे. ही शस्त्रक्रिया गुजरातमधील अहमदाबादमध्ये करण्यात आली. या शस्त्रक्रियेत रुग्णाला रक्तस्त्राव होण्याची शक्यता जास्त असते. पण भारतीयडॉक्टरांनी सर्वात कठीण ऑपरेशन समजले जाणारे हृदय प्रत्यारोपण अशा प्रकारे केले की रुग्णाला रक्ताच्या एक युनिटचीही गरज भासली नाही. हा एक चमत्कारच मानला जात आहे.
आशियातील 'असे' पहिलेच हृदय प्रत्यारोपण
या शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुमारे महिनाभरापूर्वी अहमदाबादमधील मरेंगो सीआयएमएस हॉस्पिटलमध्ये झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादचे रहिवासी असलेले चंद्रप्रकाश गर्ग ५२ वर्षांचे आहेत. ज्यांचे हृदय निकामी झाले होते. रस्ता अपघातात मरण पावलेल्या ३३ वर्षीय दात्याचे हृदय त्यांना मिळाले. रूग्णालयाचे हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. धीरेन शाह यांच्या म्हणण्यानुसार, आशियामध्ये रक्त चढविल्याशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य झालेले नव्हते, पण यावेळी हृदय प्रत्यारोपणासारखी अवघड प्रक्रिया शक्य झाली.
डॉक्टरांनी केला चमत्कार
या ऑपरेशनमध्ये सर्वप्रथम, अमेरिकेतून आणलेल्या एका विशेष मशीनद्वारे शस्त्रक्रियेदरम्यान रक्त पातळ आणि घट्ट होण्यावर लक्ष ठेवण्यात आले. रुग्णाचे किती रक्त कमी होऊ शकते आणि कमी-जास्त रक्तस्त्राव होण्याचे कारण काय हे सांगण्यास हे मशीन सक्षम आहे. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेपूर्वी आणि दरम्यान रुग्णाच्या स्थितीचे आणि त्याच्या रक्ताचे विश्लेषण केले. म्हणजेच, रक्त गोठणे किती आहे आणि ते किती पातळ होत आहे? बारीक होण्यामागे कोणती कारणे असू शकतात आणि रक्तप्रवाह व्यवस्थित कसा राखता येईल यावर लक्ष केंद्रित केले होते.
एका तासात दोन शस्त्रक्रिया
रक्त गोठवताना किंवा पातळ करताना यकृत कसे काम करेल, या सर्व गोष्टीही शस्त्रक्रियेदरम्यान पाहण्यात आल्या. शस्त्रक्रियेची वेळ कमीत कमी ठेवण्यात आली होती. छाती उघडायला, हृदय प्रत्यारोपण करायला आणि पुन्हा बंद करायला एकूण एक तास लागला. सहसा यास दोन तास लागतात. त्यात रक्त हा अवयव मानला जातो. पण डॉक्टरांनी चमत्कार केला.
'हृदय प्रत्यारोपणात 5 ते 7 युनिट रक्त द्यावे लागते'
साधारणपणे, प्रत्येक मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला रक्त दिले जाते, हृदय प्रत्यारोपणामध्ये 5 ते 7 युनिट रक्त द्यावे लागते. परंतु रक्तदान केल्याने संसर्ग होऊ शकतो, रुग्णाचे तापमान कमी किंवा जास्त असू शकते, रुग्णाचे शरीर पूर्णपणे रक्त नाकारू शकते. असे धोके कायम आहेत. पण या नवीन यांत्रिक तंत्राने रक्ताची गरज पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते किंवा कमी करता येते. हे तंत्र इतर शस्त्रक्रियांमध्ये देखील वापरले जाऊ शकते. हे अमेरिकन तंत्रज्ञान सध्या फक्त अहमदाबादमध्येच उपलब्ध आहे.