औषधं घेतांना तुम्हीही 'या' चुका करता का? पडू शकतात महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:32 PM2023-01-24T12:32:57+5:302023-01-24T12:33:15+5:30
Health Tips : सामान्यपणे आपण जे खातो त्याचा आपण घेत असलेल्या औषधांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे उपचार घेत असताना किंवा औषधे घेत असल्यास कोणते पदार्थ घेणे टाळले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Health Tips : एखाद्या रूग्णावर उपचार सुरू असताना डॉक्टर वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. यातीलच एक महत्वाचा सल्ला म्हणजे आहार. सामान्यपणे आपण जे खातो त्याचा आपण घेत असलेल्या औषधांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे उपचार घेत असताना किंवा औषधे घेत असल्यास कोणते पदार्थ घेणे टाळले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चहा-कॉफी
औषधे ही गरम गोष्टींमुळे खराब होतात. औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्यासोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा तुम्हाला मिळत नाही. अशात बरं होईल की, तुम्ही चहा-कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थासोबत किंवा पेयासोबत औषध घेऊ नये. औषधे थंड किंवा नॉर्मल पाण्यासोबत घ्यावीत.
आंबट फळं
जेव्हा तुम्ही औषधे घेता, तेव्हा आंबट फळं खाऊ नये. आंबट फळं ५० पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी औषधे घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्ष, लोणचं, चिंच खाऊ नका.
केळी
केळींमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल जसे की, कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन इत्यादी घेत असाल तर केळीसहीत इतरही पोटॅशिअम असलेली फळे किंवा पदार्थ खाऊ नये. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्यामुळे बरं होईल की, ब्लड प्रेशरच्या औषधांसोबत केळ्यासारखे पोटॅशिअमयुक्त पदार्थ खाऊ नयेत.
डेअरी प्रॉडक्ट्स
डेअरी उप्तादने जसे की, दूध, पनीर, दही आणि मलाई सारखे पदार्थ तुमच्या शरीरात काही अॅंटीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात. दुधातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारख्या खनिजांनी प्रोटीनसोबत काही रिअॅक्शन होतात. याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो.
अल्कोहोल
अल्कोहोलसोबत औषधे अजिबात घेऊ नये. औषधांमध्ये असे अनेक केमिकल्स असतात, जे अल्कोहोलसोबत रिअॅक्शन करू शकतात. अशात औषधांचा फायदा होण्याऐवजी याने जीवाला धोकाही होऊ शकतो.
सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स
सोडा आणि कोल्ड ड्रिंक्ससोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका. अशात औषध तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.