छासमध्ये मीठ टाकणं मोठी चूक, पोटाचं होतं मोठं नुकसान; मग त्यात काय टाकावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 09:50 AM2023-04-25T09:50:03+5:302023-04-25T09:50:45+5:30

How To Drink Chaas/Mattha : भारतात अनेक ठिकाणी याला मठ्ठाही म्हटलं जातं. जास्तीत जास्त लोक छासमध्ये मीठ टाकून पिणं पसंत करतात. पण ही फार मोठी चूक आहे.

Mistakes to avoid while drinking buttermilk and things to mix in it instead of salt | छासमध्ये मीठ टाकणं मोठी चूक, पोटाचं होतं मोठं नुकसान; मग त्यात काय टाकावं?

छासमध्ये मीठ टाकणं मोठी चूक, पोटाचं होतं मोठं नुकसान; मग त्यात काय टाकावं?

googlenewsNext

How To Drink Chaas/Mattha : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोक छास पिण्याचा आनंद घेतात. छास किंवा ताक पोटासाठी फार फायदेशीर मानलं जातं. सोबतच याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. भारतात अनेक ठिकाणी याला मठ्ठाही म्हटलं जातं. जास्तीत जास्त लोक छासमध्ये मीठ टाकून पिणं पसंत करतात. पण ही फार मोठी चूक आहे.

छास हे दह्यापासून तयार केलं जातं. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, रायबोफ्लेविन आणि प्रोबायटिक्स असतात. या सगळ्या गोष्टी पोट निरोगी ठेवण्यासाठी, आतड्या आणि मजबूत हाडांसाठी फायदेशीर असते.

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजानुसार, छासमध्ये मीठ टाकून पिण आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. याचा वाईट परिणाम थेट पोटावर पडतो. त्यामुळे मिठाऐवजी छासमध्ये इतर गोष्टी मिक्स करून प्यायला हवं.

छासमध्ये असतात गुड बॅक्टेरिया

छासमध्ये अनेक हेल्दी बॅक्टेरिया आढळतात. जे नियंत्रित प्रमाणात गट हेल्थ (Gut Health) साठी चांगले मानले जातात. यांना प्रोबायोटिक्स म्हटलं जातं. पण या पेयामध्ये मीठ मिक्स केलं तर यातील प्रोबायोटिक्सचा प्रभाव कमी होतो.

प्रोबायोटिक्सना मारतं मीठ

न्यूट्रिशनिस्टनुसार, मीठ टाकल्याने काही हेल्दी बॅक्टेरियासाठी घातक वातावरण तयार होतं. ज्यामुळे प्रोबायोटिक्स नष्ट होतात. तसेच याने शरीरातील पेशी डिहायड्रेट करण्याचं कामंही करतं.

स्टडीमधून दावा

किरण कुकरेजा यांनी एका स्टडीचा हवाला देत सांगितलं की, Streptococcus Thermophilus नावाचा एक बॅक्टेरिया अशा कल्चरमध्ये जिवंत राहू शकत नाही. ज्यात सोडिअम कंसंट्रेशन 2 टक्क्यांपेक्षा जास्त होतं.

छासमध्ये काय टाकून प्यावं?

जीरं पावडर

पुदीन्याच्या वाळलेल्या पानांचं पावडर

कोथिंबीरीची पाने

मिठाने पोटाचं होईल नुकसान

जेव्हा गटचे हेल्दी बॅक्टेरिया असंतुलित होतात, तेव्हा पोटाला सगळ्यात जास्त नुकसान होतं. ज्यामुळे तुम्हाला गॅस, पोट फुगणे, वजन अचानक कमी होणे, त्वचेसंबंधी समस्या, मूड स्विंग, इंसोम्निया, थकवा, गोड खाण्याची इच्छा अशा समस्या होऊ शकतात.

Web Title: Mistakes to avoid while drinking buttermilk and things to mix in it instead of salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.