साखरेचा चहा नेहमीच पित असाल, आता थोडं मीठ टाकून बघा; फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 10:45 AM2024-03-16T10:45:53+5:302024-03-16T10:46:35+5:30

Mix sugar and salt in tea : चहामध्ये साखरेसोबत थोडं मीठ टाकलं तर हा उपाय पोटाच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो.

Mix salt with sugar in tea you will get amazing benefits | साखरेचा चहा नेहमीच पित असाल, आता थोडं मीठ टाकून बघा; फायदे वाचून व्हाल अवाक्...

साखरेचा चहा नेहमीच पित असाल, आता थोडं मीठ टाकून बघा; फायदे वाचून व्हाल अवाक्...

Mix sugar and salt in tea :  सामान्यपणे सगळेच लोक चहामध्ये साखर टाकतात. पण डायबिटीसचे रूग्ण विना साखरेचा चहा पितात. अशात आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, चहामध्ये साखरेसोबतच थोडं मीठ घाला तर? हे जरा अजब वाटू शकतं. मात्र, हा उपाय आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरू शकतो. चहामध्ये साखरेसोबत थोडं मीठ टाकलं तर हा उपाय पोटाच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. ग्रीन टी मध्ये साखरेऐवजी थोडं मीठ टाकून प्याल तर तुमचा मेटाबॉलिज्म रेट सुधारतो. जाणू घेऊ फायदे...

चहामध्ये टाका काळं मीठ

- जर तुम्ही ग्रीन किंवा ब्लॅक टी मध्ये मीठ टाकून प्याल तर तुमचं डायजेस्टिव सिस्टीम चांगलं होतं. याने अन्न लवकर पचतं. चहा उकडून तयार झाल्यावर चहात चिमुटभर मीठ टाका.

- जर तुम्ही काळा चहा केला असेल आणि त्याची चव फार कडवट झाली असेल तर त्यात चिमुटभर मीठ टाका. याने चहाचा कडवटपणा कमी करण्यास मदत मिळते.

- एका शोधानुसार, मीठ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात महत्वाची भूमिका निभावतं. ज्यामुळे घशाच्या इन्फेक्शनपासून आणि वातावरणातील बदलामुळे होणारं इन्फेक्शन टाळता येतं.

- मिठामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहेत आणि आपल्या चहामध्ये थोडं मीठ मिक्स केल्याने घाम आणि इतर कामांमुळे कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा मिळवण्यास मदत मिळते.

- उदाहरणार्थ सैंधव मिठात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे खनिज असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Web Title: Mix salt with sugar in tea you will get amazing benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.