कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करण्याचे जबरदस्त फायदे, कधीच बिघडणार नाही पोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:09 AM2024-11-13T10:09:18+5:302024-11-13T10:09:50+5:30

Asafoetida Water Health Benefits: हा एक नॅचरल उपाय असून शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला तर जाणून घेऊ कसं करावं याचं सेवन आणि काय मिळतात फायदे.

Mixing Asafoetida in lukewarm water benefits | कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करण्याचे जबरदस्त फायदे, कधीच बिघडणार नाही पोट!

कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करण्याचे जबरदस्त फायदे, कधीच बिघडणार नाही पोट!

Asafoetida Water Health Benefits: भारतीय किचनमध्ये हींगाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. मात्र, अनेकांना हींग कोमट पाण्यात टाकून पिण्याचे फायदे माहीत नसतात. हा एक नॅचरल उपाय असून शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला तर जाणून घेऊ कसं करावं याचं सेवन आणि काय मिळतात फायदे.

१) पचन तंत्र सुधारतं

हींगाचा सगळ्यात जास्त फायदा पचन तंत्राला मिळतो. कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्याने अपचन, गॅस आणि पोटात जडपणा वाटणे अशा समस्या दूर होतात. तसेच अॅसिडिटीची समस्या देखील होत नाही. इतकंच नाही तर पोटातील सूजही याने कमी होते. ज्या लोकांना नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो. 

२) गॅस्ट्रिक समस्या होतात दूर

हींग गॅस्ट्रिक समस्या दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. जर तुमच्या पोटात नेहमीच गॅस होत असेल किंवा सूज असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करावं. या समस्या काही दिवसात दूर होतील. याने पोटातील अतिरिक्त गॅस बाहेर निघतो.

३) उचकी रोखण्यास फायदेशीर

जर कुणाला सतत उचक्या लागत असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्यास आराम मिळेल. हींगाच्या सेवनाने उचकी लगेच बंद होईल. कारण याने तंत्रिका तंत्र शांत होतं आणि घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो.

४) बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल

बद्धकोष्ठतेची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. अशात कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 

५) थकवा आणि कमजोरी होईल दूर

जर तुम्हाला सतत थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर हा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. नियमितपणे कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास तुम्हाला एनर्जी मिळेल आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहील. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर राहिल्यास वेगवेगळ्या आजारांचा धोकाही कमी राहतो. 

६) शरीरात रक्त वाढतं

हींगात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत मिळते. कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि शरीरात रक्त वाढवतं.

७) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल

हींगाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या लवचिक होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. 

कसं कराल सेवन?

कोमट पाण्यात चिमुटभर हींग टाका आणि चांगलं मिक्स करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळेल. सुरूवातील हींगाच प्रमाण कमी ठेवा. हींग जास्त घ्याल तर समस्याही होऊ शकते. हींगाचे अनेक फायदे असले तरी याच्या जास्त सेवनाने नुकसानही होऊ शकतं. 

Web Title: Mixing Asafoetida in lukewarm water benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.