शारीरिक संबंधानंतर धड चालूही शकत नव्हती मॉडल, कारण समजल्यावर झाली हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:04 PM2022-01-14T12:04:12+5:302022-01-14T12:04:55+5:30
Bryanna Alexis : तीन दिवस तिला याचा बराच त्रास झाला. ब्रिआना एलेक्सिसला STD म्हणजे Sexually Transmitted Diseases चा धोकाही होता आणि तिने STD ची टेस्टही केली.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारी ब्रिआना एलेक्सिस तेव्हा १८ वर्षांची होती. तिने पहिल्यांदा कंडोम वापरून शारीरिक संबंध ठेवले तेव्हा तिला इतका त्रास झाला की, ती बरोबर चालू पाण शकत नव्हती. त्याच्या त्वचेवर सूज आणि रॅशेज आले होते. उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तीन दिवस तिला याचा बराच त्रास झाला. ब्रायना एलेक्सिसला (Bryanna Alexis) STD म्हणजे Sexually Transmitted Diseases चा धोकाही होता आणि तिने STD ची टेस्टही केली.
त्यानंतरही तिने जेव्हा जेव्हा तिने कंडोमचा वापर केला, तिला त्रास झाला. अखेर जेव्हा ब्रायना एलेक्सिस २१ वर्षांची झाली तेव्हा तिला समजलं की, तिला Latex ची अॅलर्जी आहे. अनेक प्रकारच्या कंडोममध्ये Latex चा वापर केला जातो.
आता २६ वर्षीय ब्रायना सांगते की, दरवेळी शारीरिक संबंधानंतर होणाऱ्या त्रासामुळे तिचं जीवन प्रभावित झालं होतं. पण Latex पासून अॅलर्जीची माहिती मिळाल्यावर आता तिने पुन्हा सेक्शुअल कॉन्फिडन्स मिळवला आहे.
आता ब्रायना अशा कंडोमचा वापर करते जे Non-Latex च्या रबरापासून तयार केले जातात. ब्रायना आता मॉडल म्हणून फेमस झाली आहे आणि सेक्स कोच म्हणूनही तिने तिची ओळख बनवली आहे.
ब्रायना आता इतर लोकांना सल्ले देते की, जर त्यांना सेक्शुअल लाइफमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी दुर्लक्ष न करता ती समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ती सांगते की, शारीरिक संबंध कुणासाठीही त्रासदायक होऊ नये.
काय असते Latex अॅलर्जी?
जेव्हा एखाद्या व्यक्तीची बॉडी Latex ला नुकसानकारक पदार्थ समजते तेव्हा शरीर त्यासोबत लढण्यासाठी अॅंटीबॉडीजला ट्रिगर करते. पुढच्यावेळी जेव्हा व्यक्ती पुन्हा लेटेक्सच्या संपर्कात येते तेव्हा अॅंटीबॉडीज इम्यून सिस्टीमला माहिती देतात. मग शरीर हिस्टामाइन आणि इतर अन्य प्रकारचे केमिकल रक्तात पाठवू लागतं. याच कारणाने अॅलर्जी साइन दिसू लागतात. अॅलर्जी असलेल्या वस्तू दूर ठेवूनच यापासून बचाव केला जाऊ शकतो.