शरीरावरील 'या' खुणा आहेत कॅन्सरची लक्षणं, वेळीच ओळखा अन्यथा पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 04:52 PM2022-09-26T16:52:16+5:302022-09-26T16:55:57+5:30

चामखिळी या काळ्या किंवा भुरकट रंगाच्या असतात आणि त्वचेवर कुठेही त्या तयार होऊ शकतात. बहुतांश वेळा बालपणापासून ते वयाच्या 25 वर्षापर्यंत चामखीळ तयार होतात.

moles and freckles skin cancer | शरीरावरील 'या' खुणा आहेत कॅन्सरची लक्षणं, वेळीच ओळखा अन्यथा पडेल महागात

शरीरावरील 'या' खुणा आहेत कॅन्सरची लक्षणं, वेळीच ओळखा अन्यथा पडेल महागात

googlenewsNext

एखाद्या व्यक्तीच्या चेहरा किंवा मानेवर चामखीळ असणं ही अतिशय सामान्य बाब आहे. अनेकांच्या शरीरावर चामखीळ दिसते. याचा त्रास काही नसला तरी याच्यामुळे व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी याचे दुष्परिणामच अधिक दिसून येतात. त्वचेवर असलेली चामखीळ अनेक प्रकारची असू शकते. चामखिळी या काळ्या किंवा भुरकट रंगाच्या असतात आणि त्वचेवर कुठेही त्या तयार होऊ शकतात. बहुतांश वेळा बालपणापासून ते वयाच्या 25 वर्षापर्यंत चामखीळ तयार होतात.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर कमीतकमी 10 व जास्तीत जास्त 40 पर्यंत चामखिळी असू शकतात. कालांतराने या चामखिळींच्या रंगांत बदल झाल्याचंही दिसून येतं. काहीवेळा तर चामखिळीवर केस उगवण्याचे प्रकारही घडतात. बहुतांश वेळा चामखिळीचा कॅन्सरशी संबंध नसतो. परंतु याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. चामखिळीचा आकार किंवा रंगात बदल होत असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं.

चामखिळीमुळे कॅन्सर होतो का?
वेब एमडीने दिलेल्या माहितीनुसार, जन्मपासून ज्या व्यक्तींच्या शरीरावर चामखीळ किंवा तीळ असतो, अशा 100 पैकी एखाद दुसऱ्या व्यक्तीला मेलानोमा म्हणजेच कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. थेरपी सेंटर डॉट कॉमनुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील तीळ किंवा चामखीळ एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या दिसत असतील तर हा चिंतेचा विषय ठरू शकतो. चामखीळ एका बाजूला टोकदार असेल तर ही त्वचेच्या कॅन्सरची सुरुवात असू शकते. या कॅन्सरचा इशाराही असू शकतो. जर चामखिळीचा रंग एकमेकांपेक्षा वेगळा असेल तर ते धोकादायक ठरू शकतं.

ही असू शकते धोक्याची घंटा
चेहरा, मान किंवा शरीरावर अनेक ठिकाणी चामखीळ आढळते. त्या लाल, पांढऱ्या, गुलाबी, भुरकट तसेच काळ्या रंगाच्या असतात. चेहरा किंवा मानेवर चामखीळ येत असल्यास याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चामखिळीचा रंग आणि आकार या दोन्हीत बदल होत असल्यास त्वचेच्या कॅन्सरची ही सुरूवात असू शकते.

दरम्यान, शरीरावर येणाऱ्या चामखीळ आनुवंशिक असतात तर कधी शरीरातील बदलणाऱ्या हॉर्मोन्समुळे पण आढळतात. शरीरावर चामखिळींची संख्या जास्त असल्यास ते सौंदर्यात बाधक ठरू शकतं. बऱ्याचदा तज्ज्ञ शस्त्रक्रिया करून चामखीळ काढण्यास सांगतात. पण काही घरगुती उपाय करून याला नाहीसं करता येऊ शकतं. यात प्रामुख्यानं लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखिळीवर लावावी. आठवड्यातून किमान 3-4 वेळा असं केल्यानं याचा परिणाम दिसून येऊ शकतो. याशिवाय खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडाही चामखिळीला नाहीसं करण्यास फायदेशीर ठरतो.

Web Title: moles and freckles skin cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.