चवीने मोमोज खाताय? वेळीच व्हा सावध अन्यथा पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 12:44 PM2018-10-01T12:44:00+5:302018-10-01T12:44:30+5:30

सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजला लोकांकडून जास्त पसंती मिळत आहे. जागोजागी आपल्याला मोमोजचे स्टॉल दिसून येतात. मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ खाण्यासही चांगला लागतो. त्यामुळे सध्या तरूणाईही याकडे आकर्षित होताना दिसतेय.

momos are harmful for human body and causes to disease | चवीने मोमोज खाताय? वेळीच व्हा सावध अन्यथा पडू शकतं महागात!

चवीने मोमोज खाताय? वेळीच व्हा सावध अन्यथा पडू शकतं महागात!

Next

सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजला लोकांकडून जास्त पसंती मिळत आहे. जागोजागी आपल्याला मोमोजचे स्टॉल दिसून येतात. मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ खाण्यासही चांगला लागतो. त्यामुळे सध्या तरूणाईही याकडे आकर्षित होताना दिसतेय. परंतु तुम्हाला माहीत आहे का? मोमोज तुमच्या शरीरासाठी हानिकारक असतात. ऐकून धक्का बसला असेल ना? 

अनेकांना असं वाटतं की हे वाफवलेले असतात त्यामुळे शरीरासाठी फायदेशीर असतात परंतु, मोमोज तयार करण्यासाठी मैदा वापरण्यात येतो. मोमोज किंवा इतरही मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमुळे शरीराला अनेक साइड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. कारण त्यामध्ये फायबर नसतं. त्यातच मैद्याला पांढरा रंग आणि चमकदार बनवण्यासाठी बेंजोइल पॅराऑक्साइडने ब्लीच करण्यात येतं. त्याचप्रमाणे यामध्ये अनेक वेगवेगळे केमिकल्स म्हणजेच Azodicarbonamdide, Chlorinegas मिक्स करण्यात येतात.  हे केमिकल्स मैदा मुलायम होण्यास मदत करतात. 

मैद्यामध्ये मिसळण्यात येणारे हे केमिकल्स आतड्यांना नुकसान पोहोचवतात. यामुळे आतड्यांमधील इन्सुलिन बनवण्याची क्षमता कमी होते. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, पॅनक्रिया आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाणे नियंत्रित ठेवण्यास मदत करते. परंतु, मैदा ब्लीच करण्यासाठी उपयोग करण्यात येणारे केमिकल्स थेट पॅनक्रियावर परिणाम करतात. पॅनक्रियावर परिणाम झाल्यामुळे शरीरातील इन्सुलिन हार्मोन्सचं सेक्रेशन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजाराचा समना करावा लागतो. 

बाजारामध्ये आढळणाऱ्या मोमजमध्ये अनेक प्रकार आढळून येतात. त्यातल्यात्यात व्हेज आणि नॉन-व्हेज असे प्रकार करण्यात येतात. त्याचप्रमाणे मोमोजच्या आतमधील सारण तयार करण्यासाठी ज्या पदार्थांचा वापर करण्यात येतो, ते चांगल्या क्वॉलिटीचे नसतात. त्याचप्रमाणे मोमोजसाठी वापरण्यात येणारं चिकनही चांगल्या क्वॉलिटीचं नसतं. त्यामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे व्हेज मोमोज तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्याही स्वच्छ आणि चांगल्या क्वॉलिटीच्या नसतात. मोमोजसोबत देण्यात येणारी चटणीदेखील आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे तुमचं पचनतंत्र कमजोर होण्याचीही शक्यता असते. 

Web Title: momos are harmful for human body and causes to disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.