पावसाळ्यात केसांची आणि पायांची काळजी कशी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 10:45 AM2018-05-25T10:45:40+5:302018-05-25T10:45:40+5:30
पावसात भिजण्याचा आनंद सर्वांनीच घ्यावा पण काही गोष्टींची काळजीही घेणे गरजेचे आहे. खासकरुन या दिवसात केसांची आणि पायांची काळजी घेणे फारच आवश्यक आहे.
सर्वचजण सध्या पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. पावसात चिंब भिजण्याची सर्वांनाच ओढ लागली आहे. पावसात भिजण्याचा आनंद सर्वांनीच घ्यावा पण काही गोष्टींची काळजीही घेणे गरजेचे आहे. खासकरुन या दिवसात केसांची आणि पायांची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. नाहीतर अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
त्यामुळे केस चांगले ठेवायचे असतील तर केसांच्या उत्पादनांचा कमीत कमी वापर करा आणि पाय चांगले ठेवण्यासाठी लॅक्टिक अॅसिड युक्त मॉईश्चरायझरचा वापर करा. चला आज आपण पावसाळ्यात केसांची आणि पायांची कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.
- नेहमी केसांची काळजी घेण्यासाठी ज्या उत्पादनांचा वापर करता त्या उत्पादनांचा कमीत कमी वापर करा. शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा आणि हेअर स्प्रेचा वापर करणे शक्यतो टाळा.
- प्रत्येकवेळी केस धुतल्यानंतर कंडीशनरचा वापर करा. मात्र, केसांच्या मुळात लावण्यापेक्षा वरवर लावा.
- प्रोटीनयुक्त आहार सेवन करा. जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचं सेवन करा, तसेच भरपूर पाणी घ्या.
- मान्सूनमध्ये छोटे केस ठेवा आणि कोकनट ऑईलने हळुवार मालिश करा. यामुळे केसांना पोषण मिळतं.
- मान्सूनमध्ये हेअर ड्रायरचा वापर टाळा आणि जर तो वापरण्याची गरजच असेल तर आधी केस कोरडे करा. हेअर ड्रायरला कमीत कमी सहा इंच दूर ठेवूनच वापरा.
- पावसात केस ओले होण्यापासून वाचवा, खासकरून सुरूवातीच्या दिवसात ही काळजी अधिक घ्या. कारण पावसाच्या पाण्यात हवेतील कण असतात, जे तुमच्या केसांना कमजोर आणि निर्जिव करू शकतात.
पायांची काळजी कशी घ्याल?
- पावसात भिजल्यास कोमट पाण्याने चांगली आंघोळ करा आणि शरिर चांगल्या प्रकारे कोरडं झाल्यावरच कपडे परिधान करा.
- फंगल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी पायांना स्वच्छ आणि कोरडे ठेवा. साबणाने पायांना धुवून अॅंटी-फंगल पावडर लावा. आणि ओपन शूज घाला. भिजलेले सॉक्स घालू नये.
- पायांना मुलायम ठेवण्यासाठी लॅक्टिक अॅसिड आणि ग्लाईकोलिक अॅसिड युक्त मॉईश्चरायझरचा वापर.