मधुमेह असलेल्या लोकांनी पावसाळ्यात असा ठेवावा डेली रुटीन! फॉलो करा 'या' खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 04:24 PM2024-06-29T16:24:25+5:302024-06-29T16:28:09+5:30
पावसाळ्यात मुधुमेह, हृदयरोग असणाऱ्या लोकांनी आरोग्य सबाधित राखण्यासाठी योग्य पोषण आणि जीवनशैलीतील बदल गरजेचा आहे.
Health Tips : उच्चआर्द्रता , वारंवार पाऊस आणि संक्रमणाचा वाढता धोका यामुळे आरोग्य व्यवस्थापनात गुंतागुंत होऊ शकते. या काळात विशेषतः मधुमेह तसेच हृदयरोग असणााऱ्या लोकांनी आरोग्य सबाधित राखण्यासाठी योग्य पोषण आणि जीवनशैलीतील बदल गरजेचा आहे. अर्थातच त्यासाठी त्यासाठी सर्व ऋतूंमध्ये हंगामी फळांचा, भाज्यांचा जेवणात समावेश करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय आहारतज्ज्ञ सांगतात.
हंगामी फळे, भाज्यांचे फायदे?
१) सुरळीत पचनास मदत करतात.
२) सामान्य गॅस्टोइंटेस्टाइनल समस्या टाळतात.
३) हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देतात.
४) पित्त काढून टाकतात.
५) रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
६) रक्तदाब नियंत्रित करतात.
हळद, मिरी त्याच्या शक्तीशाली दाहक-विरोधी आणि अॅटिऑक्सिडंट गुणधर्मासह जळजळ कमी करण्यात व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. कर्फ्यूमिनचे शोषण वाढवते आणि चयापचय क्रिया सुधारते. आले आणि लसूण हे हृदय-संरक्षणात्मक फायदे देतात. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.
हंगामी भाज्यांमध्ये कारले, पडवळ, दुधी, बीटरूट, मुळा, सुरण, शिराळे, घोसाळे अशा विविध प्रकारच्या भाज्या जेवणात असाव्यात. या भाज्या नैसर्गिकरीत्या हवामानाच्या गरजांशी जुळवून घेतात. त्यामुळे या हंगामासाठी त्या उत्तम आहेत.
हंगामी फळे खा!
पावसाळ्यात सफरचंद, जांभूळ, पेर, प्लम्स, चेरी पीच, सीताफळ ही फळे खा. ही सर्व फळे केवळ जीवनसत्त्वांनी भरलेली नसून शरीराला चांगल्या प्रकारे हायड्रेटेड ठेवण्यास आणि शरीरातील जास्त सूज टाळण्यास मदत करतात.
व्यायाम करा, फीट राहा!
१) पावसाळ्यात तुम्ही योगासने, पिलेट्स असे व्यायाम करू शकता. साधे स्ट्रेचिंग किंवा पाऊस थांबला तर बाहेर थोडे चालण्याचा प्रयत्न करा.
२) नियमित व्यायामामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते.
३) मधुमेह आणि हृदयाच्या समस्यांसारख्या परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी इन्शुलिन संवेदनशीलता आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य वाढवण्यास मदत होते.