पावसाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, काय करु नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 11:25 AM2018-05-25T11:25:06+5:302018-05-25T11:25:06+5:30

या दिवसात तुमच्या जीभेला चोचल्यांना जरा आवर घातलेला बरा. चला जाणून घेऊया पावसाळ्यात काय काळजी घ्यावी, जेणेकरुन आरोग्य चांगलं राहिल. 

Monsoon Special : Essential monsoon health tips to safeguard you this monsoon/ | पावसाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, काय करु नये!

पावसाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, काय करु नये!

Next

पावसाळा भलेही रोमॅंटिक आणि आनंद देणारा असला तरी अनेक आजारांना घेऊन येणाराही असतो. याच सीझनमध्ये अनेकजण जास्त आजारी पडतात. या दिवसात खाण्या-पिण्याबाबत केलेला निष्काळजीपणा तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. अशात या दिवसात तुमच्या जीभेला चोचल्यांना जरा आवर घातलेला बरा. चला जाणून घेऊया पावसाळ्यात काय काळजी घ्यावी, जेणेकरुन आरोग्य चांगलं राहिल. 

* पावसाळ्यात घ्यावयाची काळजी:

1) पावसात भिजणे शक्यतो टाळा आणि भिजल्यास कोरड्या टॉवेलनं अंग पुसून घ्या.

2) भीजलेले कपडे जास्त वेळ अंगावर राहू देऊ नका

3) पावसातून बाहेरून घरात आल्यावर आधी पाय स्वच्छ कोरडे करावेत. तसेच ओले मोजे वापरू नयेत.

4) पावसात भिजल्यास घरी आल्यावर प्रथम अंघोळ करून मगच कोरडे कपडे घालावेत.

5) अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारा जंतुसंसर्ग काही प्रमाणात टाळता येतो.

6) केस व कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाण्याचे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला असे आजार होण्याची शक्‍यता असते.

7) डास निर्मूलनासाठी विविध उपाययोजना कराव्यात.

8) नियमितपणे अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावावे.

* आहारविषयक घ्यावयाची काळजी:

1) भेळपुरी, पाणीपुरी, भजी, सॅंडविच इत्यादी बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.

2) बर्फाचा गोळा, रस्त्यावर मिळणारे फळांचे रस आणि कुल्फी असे पदार्थ टाळावेत.

3) तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

4) मांसाहार करणाऱ्यांनी या दिवसांमध्ये मासे खाणे टाळावे. कारण हा माशांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो, त्यामुळे पचनसंस्थेला जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते.

5) आंबट, शीत पदार्थ टाळावेत.

6) पावसाळ्यात नेहमी आरोग्यकारक, चांगले शिजवलेले आणि गरम असे घरचेच जेवण घेणे हितकारक ठरते.

7) नेहमीच्या चहाऐवजी जर औषधी चहा, ग्रीन टी घेतली तर आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. कॉफीमुळे Dehyadration होत असल्यामुळे कॉफी घेणे टाळावे.

8) पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी वॉटर प्युरिफायरचा वापर करावा. ते शक्‍य नसल्यास पाणी गाळून उकळवून मगच पिण्यासाठी वापरावे.

9) अन्नपचन नीट व्हावे, यासाठी या काळात भरपूर पाणी पिणे योग्य ठरते.

10) बाहेर पाणी पिणे शक्‍यतो टाळावे. बाहेर पडताना नेहमी आपली पाण्याची बाटली जवळ ठेवावी.
 

Web Title: Monsoon Special : Essential monsoon health tips to safeguard you this monsoon/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.