एक महिना खाऊन बघा सालीची मूग डाळ, फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:28 PM2024-09-03T14:28:19+5:302024-09-03T14:28:57+5:30

Moong Dal Benefits : या डाळीचं एक महिना सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी दूर होईल आणि तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊ सालीची मूग डाळ खाण्याचे फायदे...

Moong Dal Benefits : Eating moong dal for one month, pulse for weight loss | एक महिना खाऊन बघा सालीची मूग डाळ, फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

एक महिना खाऊन बघा सालीची मूग डाळ, फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

Weight Loss: भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीनसोबतच अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशाच डाळीच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. या डाळीचं एक महिना सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी दूर होईल आणि तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊ सालीची मूग डाळ खाण्याचे फायदे...

मूग डाळीमधील पोषक तत्व

सालीच्या मूग डाळीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम यांसारखे पोषक तत्व असतात. जे तुमचं एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच यात आढळणारं फायबर तुमचं वजन कमी करण्यासही मदत करतं. 

जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, तब्येत बिघडली किंवा पोट खराब झालं तेव्हाच या डाळीचं सेवन करावं. पण असं काही नाहीये. या डाळीच्या सेवनाने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. अशात आज जाणून घेऊ या डाळीच्या सेवनाचे फायदे...

वजन कमी करण्यासाठी मूग डाळ

मूग डाळीमध्ये कोलेसिस्टोकायनिन हार्मोन वाढवणारे तत्व असतात. ज्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.

मूग डाळीच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. ज्याने तुम्हाला लवकर वजन कमी करता येईल.

मूग डाळीचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. भाजी, सलाद, सूप किंवा मोड आलेल्या मूग डाळीचं सेवन तुम्ही करू शकता. 

मूग डाळीमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात तुम्ही जास्त काही खाणं टाळू शकता.

सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले मूग खाल्ल्याने तुमची पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते. 

Web Title: Moong Dal Benefits : Eating moong dal for one month, pulse for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.