आयर्नच्या जास्त प्रमाणामुळे फुप्फुसांच्या आजारांचे व्हाल शिकार, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:45 PM2020-05-05T12:45:47+5:302020-05-05T12:56:24+5:30
हिमोग्लोबिन सिंथेसिसमध्ये आयर्नची भूमिका महत्वाची असते. शरीरातील हिमोग्लोबिन एक असा घटक आहे ज्यामुळे ऑक्सिजन सुरळीतपणे अवयवांपर्यंत पोहोचतो.
आयर्न शरीरातील मह्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनिमियाची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. एनिमिया या आजारात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या कमतरतेसह पेशी कमी होण्याची समस्या उद्भवते. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचं प्रमाण वाढल्यामुळे अस्थमासारखा गंभीर आजार होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या रिसर्च बाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरासाठी आयर्न गरजेचं का आहे
आयर्नमधील पोषक घटकांची शरीराला आवश्यकता असते. हिमोग्लोबिन सिंथेसिसमध्ये आयर्नची भूमिका महत्वाची असते. शरीरातील हिमोग्लोबिन एक असा घटक आहे ज्यामुळे ऑक्सिजन सुरळीतपणे शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे उर्जा निर्मीतीची प्रक्रिया व्यवस्थित होते.
शरीरात आयर्न का जमा होतं?
आपल्या खाण्यापिण्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. आहारातूनच शरीराला आयर्नचा पुरवठा होत असतो. पण आयर्नचे सेवन जास्त केल्यामुळे शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये आर्यन जास्त प्रमाणात जमा होत जातं. त्यामुळे रक्तवाहिन्या सुरळीतरित्या काम करत नाहीत. आयर्नचं प्रमाण फुप्पुसांच्या पेशींमध्ये जास्त झाल्यास अस्थमाची समस्या निर्माण होऊ शकते.
फुप्फुसांवर असा होतो परिणाम
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त झाल्यामुळे इंफ्लेमेशनची समस्या निर्माण होऊ शकते. इंफ्लेमेशन म्हणजेच सूज आल्यामुळे म्यूकस तयार होऊन श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे अस्थमाची लक्षणं दिसायला सुरूवात होऊ शकते. अशा स्थितीत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. कारण फुप्फुसांना ऑक्सिजन मिळणं पूर्णपणे बंद होतं. ( हे पण वाचा-कॅन्सर नाही, तर स्तनांमध्ये गाठ होण्याची 'ही' आहेत कारणं, जाणून घ्या)
जर तुम्ही शरीरातील आयर्नची कमतरता पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक खाद्यपदार्थांचा समावेश करत असाल तर आरोग्याला कोणताही धोका नसतो. पण जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅप्सूल किंवा आयर्नच्या गोळ्यांचे सेवन करत असाल तर जीवघेणं ठरू शकतं. त्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर आयर्नच्या गोळ्यांचे सेवन करा. (हे पण वाचा-घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे)