काही वेळा ८ तासांची झोप पुरेशी नसते, ९ ते १० तास घ्यावी लागते झोप...कधी? कोणी? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:07 PM2022-08-21T16:07:46+5:302022-08-21T16:14:19+5:30

आठ तासाच्या झोपेनंतर अनेकांना सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी किमान 9 ते 10 तास झोप आवश्यक असते.

more than 8 hours of sleep is require for some people 9 to 10 hours sleep is require | काही वेळा ८ तासांची झोप पुरेशी नसते, ९ ते १० तास घ्यावी लागते झोप...कधी? कोणी? घ्या जाणून

काही वेळा ८ तासांची झोप पुरेशी नसते, ९ ते १० तास घ्यावी लागते झोप...कधी? कोणी? घ्या जाणून

googlenewsNext

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी आणि शांत झोप आवश्यक असते. पुरेशी झोप झाली तर शरीराला आणि मेंदूला आराम मिळतो आणि शरीर पुन्हा कामासाठी तयार होते. व्यवस्थित झोप झाली तर आपण थकल्याशिवाय दिवसभरातील सर्व कामे करू शकतो. आरोग्य तज्ञांनुसार निरोगी प्रौढ व्यक्तीला 24 तासांत किमान 8 तास झोप आवश्यक असते. हा शरिराला आवश्यक असलेल्या झोपेचा आदर्श कालावधी असला तरी प्रत्येक काही लोकांना यापेक्षा जास्त झोप आवश्यक असते.

प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असते. काही लोकांना 8 तासांहून अधिक वेळ झोप मिळाली नाही तर त्यांचे आरोग्य बिघडू शकते. अनेक आरोग्य तज्ञांच्या मते दोन परिस्थितींमध्ये तुम्हाला 8 तासांहून जास्त झोपेची गरज असते. कारण आठ तासाच्या झोपेनंतर अनेकांना सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी किमान 9 ते 10 तास झोप आवश्यक असते.

कधी हवी जास्त झोप?
ऋतू बदलताना : झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, वातावरणात बदल होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या सामान्य झोपेच्या वेळेपेक्षा जास्त झोप आवश्यक असते. ऋतू बदलतो तेव्हा कदाचित तुम्हाला रात्री शांत झोप न लागण्याची समस्या जाणवू शकते. अशावेळी झोप पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ झोपण्याची गरज भासू शकते.

महिलांची मासिक पाळी : दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. त्यामुळे महिलांना मासिक पाळी काळात नेहमीपेक्षा जास्त झोपेची गरज असते. महिलांनी या काळात किमान 9 तास झोप घ्यायला हवी. यामुळे तुम्हताला वेदना आणि समस्यांपासून थोडा आराम मिळू शकेल.

Web Title: more than 8 hours of sleep is require for some people 9 to 10 hours sleep is require

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.